Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगर नगरपरिषद हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक,उभारण्यात येवू नयेत.- नोडल अधिकारी -जावेद पठाण

अनगर नगरपरिषद हद्दीमध्ये  कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक,उभारण्यात येवू नयेत-  नोडल अधिकारी -जावेद पठाण


  अनगर(कटूसत्य वृत्त):-अनगर नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संस्था यांना आवाहन करण्यात येते की, नगरपरिषद हद्दीमध्ये  कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्स, पोस्टर्स इ. उभारण्यात येवू नयेत.अनगर नगरपंचायत कडून निश्चित केलेल्या ठिकाणी रीतसर परवानगी घेऊनच QR Code सह जाहिरात फलक, होर्डिंग्स, पोस्टर्स लावण्यात यावे. प्रथम दर्शनी अनधिकृत जाहिरात उभारल्याचे निदर्शनास आल्यास आपणावर मालमत्ता विरूपण प्रतिबंधात्मक कायदा १९९५ नुसार कारवाई करणेत येईल व योग्य ती शास्ती वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.या अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग्स बाबत समिती स्थापन करण्यात आली आहे.तरी अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग्स बाबत माहिती वा तक्रारीबाबत कार्यालयाकडे  संपर्क करण्यात यावा.  

           नोडल अधिकारी -जावेद पठाण (मो. ९०९६९४१२०७)  दुरध्वनी क्र : ०२१८९-२४८५२३  

           Email Id - comcangar7@gmail.com   Website: www.angarnagarpanchayat.in

Reactions

Post a Comment

0 Comments