भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,लवंगी,कारखान्याचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):-मंगळवेढा आणि जत तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी संजीवनी असलेल्या लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून, चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये भैरवनाथ शुगर कारखान्याचे दि. ७ डिसेंबर अखेर १०३७६०.८९ मेट्रीक टन गाळप झाले. गाळप पूर्ण क्षमतेने सुरु असून, कारखान्याने ठरविलेले ४ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चितच पार करु, असा विश्वास चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.
चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले,ऊस पुरवठादार सभासद शेतकरी यांच्या विश्वासाला पात्र राहून, ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, मजूर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने संचालक मंडळाने ठरविलेले ४ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट नक्कीच पूर्ण होईल. या हंगामात गळीतासाठी आलेल्या उसाचा पहिला हप्ता २७२५ रुपयांप्रमाणे ऊस पुरवठादार सभासद शेतक-यांच्या मागणीनुसार बँकां, पतसंस्थांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहेत. ऊस तोडणी वाहतुकीची बिले व कामगारांचे पगार वेळेवर अदा केले आहेत.

0 Comments