माळशिरस तालुक्यांच्या रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये मंजूर
- आ राम सातपुते
अकलूज (कटूसत्य वृत्त):-माळशिरस तालुक्यातील रस्त्यांच्या नूतणीकरणासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था होती, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी यामध्ये लक्ष घातले होते. राज्यामध्ये रस्त्यांसाठी सर्वात जास्त निधी हा माळशिरस मतदारसंघासाठी खेचण्यात यशस्वी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मिळाला असल्याची माहिती आ राम सातपुते यांनी दिली.
आमदार राम सातपुते यांनी रस्त्यांसाठी आणलेल्या या भरघोस निधीमुळे माळशिरस तालुक्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार आहे. आजपर्यंत तालुक्यात एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निधी मंजूर झाला आहे, अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची भावना तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
आ राम सातपुते हे राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व विश्वासू आमदार असल्याने माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांना जास्तीचा निधी आणण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात माळशिरस तालुक्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर झालेला हा निधी इतरांच्या निधीच्या तुलनेत सर्वात जास्त निधी असल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे
माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - -आमदार राम सातपुते
माळशिरसच्या शेवटच्या घटकांला न्याय देण्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी माझ्यावर जनसेवक म्हणून दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे, या तालुक्याने माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तालुक्याला जे जे मागितले ते दिले. रस्त्यांसाठी मी 100 कोटी रुपये आणू शकलो याचा आनंद आहे, तालुक्यातील रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार असल्याची भावना आ राम सातपुते यांनी बोलताना व्यक्त केली.

0 Comments