अत्याचार केल्याप्रकरणी बिहारी तरुणास जामीन मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 23, 2023

अत्याचार केल्याप्रकरणी बिहारी तरुणास जामीन मंजूर

अत्याचार केल्याप्रकरणी बिहारी तरुणास जामीन मंजूर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अल्पवयीन मुलीस फुस लावून पळून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. यात आरोपी नामे छट्टु रामपरवेश शर्मा असे आरोपीचे नाव असून तो राहण्यास रा. मुज्फफरपुर, बिहार येथे आहे. यात हकिकत अशी की,  दिनांक १९/०६/२०२१ रोजी फिर्यादी व तिचा पती कामावर गेले असताना ते परत आले असता त्यांची अल्पवयीन मुलगी त्यांना घरी आढळून आली नाही. त्यामुळे यातील फिर्यादीने मुलगी हरवल्याची तक्रार संबंधित पोलिस स्टेशन ला दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर पोलीस तपासामध्ये असे निष्पन्न झाले कि, यातील आरोपी नामे छट्टु शर्मा या बिहारी तरुणाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेवून लग्न केल्याचे समजले व त्यांना एक मुलगा असल्याचे समजले. त्यानुसार सदर पोलीसांनी सदर पिडीतेचा कसुन शोध घेतला असता त्याना सदर पीडिता व आरोपी हे जयपुर, राजस्थान येथे एकत्रितरित्या राहत असल्याचा सुगावा लागला त्याप्रमाने पोलीसानी सदर पीडीता व आरोपीस जयपूर येथून ताब्यात घेतले. यातील आरोपी नामे छट्टु शर्मा याने जामीन मिळणाकामी अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापुर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.  यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर पीडितेचे वय पाहता तिस फूस लावण्याचा संबंध येत नाही तसेच सदर आरोपी व पिडीतेचा एकत्रित सोलापुर ते जयपुर हा प्रवास पाहता   पिडीतेचे अपहरण केले होते असे म्हणता येणार नाही. सदरचा प्रकार निव्वळ प्रेम संबंधातून झालेला आहे असा  युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. सत्र न्यायाधीश यांनी आरोपी नामे छट्टु शर्मा रा. बिहार याची जामीनावर मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. फैय्याज शेख, ॲड .संतोष आवळे, ॲड. राम शिंदे, ॲड. सुमित लवटे, ॲड. शिवाजी कांबळे  यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages