Hot Posts

6/recent/ticker-posts

उपराष्ट्रपती यांची नकल व चेष्टा करणाऱ्या देश विरोधी इंडिया आघाडीतील घटक पक्षाचा सोलापूर भाजपा महिला आघाडीच्या वतीने निषेध व धरणे आंदोलन.

 उपराष्ट्रपती यांची नकल व चेष्टा करणाऱ्या देश विरोधी इंडिया आघाडीतील

 घटक पक्षाचा सोलापूर भाजपा महिला आघाडीच्या वतीने निषेध व धरणे

 आंदोलन.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संविधानिक पद असलेले देशाचे दोन नंबरचे पद असलेले उपराष्ट्रपती यांची देशाचे पवित्र संबोधले जाणाऱ्या संसदेत यांची चेष्टा मरकरी करून मिमिक्री करून खिल्ली उडवली जाते आणि त्यांचे व्हिडिओ राहुल गांधी शूट करतात हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी बघत आहे व देशातील जनता शरमेन मान खाली घालत आहे. अशा ह्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना संविधान मान्य नाही यावरून स्पष्ट होतं.

अशा ह्या संविधानने बहाल केलेल्या उपराष्ट्रपती  याची चेष्टा मस्करी करून मिमिक्री करणाऱ्या इंडिया आघाडीचे खासदार व  त्याचे व्हिडीओ बनवून खिल्ली उडवणारा राहुल गांधी यांचा निषेध करून धरणे आंदोलन करण्यात आला.


याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, महिला आघाडी सोलापूर शहर अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, शोभा नषटे,माजी नगरसेविका रामेश्वरी बिरु,विमल पुठ्ठा, दिपाली वडणे, संगीता खंदारे, सुनिता कोरे,जयश्री  धपाधुळे, आधी उपस्थित राहून धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments