Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

 कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा

 आढावा राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर

 ऑडीट करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश 


ठाणे(कटूसत्यवृत्त):-देशातआणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहेयापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतलीराज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरलइलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावेत्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावीनागरिकांनी घाबरून  जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावेराज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

 

मुख्यमंत्र्यांनी  दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतलीत्यामध्ये आरोग्य मंत्री डॉतानाजी सावंतवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीप्रधान सचिव विकास खारगेप्रधान सचिव  ब्रिजेश सिंहआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरसर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी  इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन प्लांट्सव्हेंटिलेटरऑक्सिजन पाईपलाईन्सआरटीपीसीआर लॅबडयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी  योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची  खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावाज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी  लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

लस  औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावीआरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटरविलगीकरण बेड्सआयसीयू बेड्सव्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहेसंपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केलेमागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहेत्यामुळे घाबरण्याचे कारण नाहीनागरिकांनी सर्दीखोकलाताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी  तात्काळ तपासणी करुन घ्यावीआगामी सण  नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावाआपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना केले.

सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेणे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाहीअफवा पसरणार नाहीमाहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावायासाठी सहकार्य करावेअसे आवाहनही त्यांनी केले.

शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णतसज्ज आहेयंत्रसामुग्रीऔषध साठाइतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध् आहेत्यामुळे जनतेने घाबरु नयेकाळजी घ्यावी काळजीअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री  मुश्रीफआरोग्य मंत्री डॉसावंत यांनी आरोग्ययंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती दिलीआरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामुग्रीइतर सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी दि१५ ते १७ डिसेंबर 2023 या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स३३ हजार ऑक्सिजन बेड्स हजार ५०० आयसीयू बेड्स  सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेतसध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंब२७पुणे-ठाणे-,कोल्हापूर- रायगड-आढळून आले आहेतअसे  म्हैसकर यांनी यावेळी सांगितलेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवमाहिती  जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव  महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईलअसे सांगितले

Reactions

Post a Comment

0 Comments