Hot Posts

6/recent/ticker-posts

जांबमुनी महाराज जयंती निमित्त दि.22 डिसेंबर रोजी भव्य रथोत्सव मिरवणूक .....! माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती....!! रथोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र आसादे यांची माहिती....!!!

 जांबमुनी महाराज जयंती निमित्त दि.22 डिसेंबर रोजी भव्य रथोत्सव मिरवणूक .....! 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती....!!

रथोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र आसादे यांची माहिती....!!! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त): -जांबमुनी मोची समाजाचे कुलदैवत श्री.  आदी जांबमुनी महाराज  जयंतीनिमित्त रथोत्सव मिरवणूक समाजाचे धर्मगुरू वैकुंठवासी ह .भ. प. गुरुदास तोडमे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली  जांबमुनी मोची समाजाचे ऐक्य व सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून परत उत्सव मिरवणूक गेल्या 28 वर्षापासून समाजाच्या वतीने  भव्य दिव्य काढण्यात येते. 

सालाबाद प्रमाणे यंदाही दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी रथोत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र आसादे  यांच्या नेतृत्वाखालीआणि आणि शहर जिल्हा जांबमुनी मोची समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष  माजी सभागृहनेते देवेंद्र भंडारे आणि युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्या सहकार्यातून रूपा भवानी मंदिरातून सकाळी आठ वाजता ज्योत रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र आसादे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आसादे म्हणाले की, " रूपा भवानी मंदिरातून सकाळी आठ वाजता ज्योत रॅली काढण्यात येणार असून या ज्योत रॅलीमध्ये समाजाचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ही ज्योत रॅली छत्रपती शिवाजी महाराज . चार पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  या थोर महापुरुषांना अभिवादन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी रेल्वे स्टेशन पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून जांबमुनी मोची समाज रथोत्सव मिरवणुकीचा शुभारंभ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आणि आजी,  माजी आमदार आणि प्रमुख राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. 

ही मिरवणूक महात्मा गांधी पुतळा, कोनापुरे चाळ,  फॉरेस्ट, जुना एम्प्लॉयमेंट चौक, मोदी पोलीस चौकी, जगजीवनराम वस्ती, सात रस्ता,  जगदंबा चौक, मौलाली चौक,  महावीर चौक, सत्यनारायण चौक ,सिद्धार्थ चौक, बापूजी नगर मधून मारुती मंदिर येथे विसर्जित होणार आहे. जांबमुनी महाराज जयंती निमित्त शिवानंद कुटी हरिपाठ मंडळ लष्कर यांच्या वतीने दिनांक 14 डिसेंबर 2023 ते 17 डिसेंबर 2023 पर्यंत किर्तन महोत्सवाचं आयोजन केले होते. कै.  चंदप्पा लच्छमय्या सज्जन  आणि कै. इरानागमम्मा चंदप्पा सज्जन यांच्या स्मरणार्थ  रामचंद्र चंदप्पा सज्जन व शांतम्मा रामचंद्र सज्जन  यांच्या वतीने श्री संत मादार चत्रया चरित्र  5000/-  ग्रंथ मोची समाज बांधवांना भेट दिले. त्याचबरोबर स्वागत नगर ,बापूजी नगर,  लष्कर,  कोनापुरे चाळ ,मोदी  या भागात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. जांबमुनी सांस्कृतिक भवन मोदी येथे वृक्षारोपण कार्यक्रम 21 डिसेंबर रोजी जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाच्या वतीने जांबमुनी महाराज  यांच्या  मूर्तीची महापूजा करण्यात येणार आहे. 

 श्री  जांबमुनी  महाराज जयंतीदिनानिमित्त दिनांक 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत कबड्डी आणि लेझीम स्पर्धा बापूजी नगर येथे घेण्यात येणार आहेत. असे अनेक विविध समाज उपयोगी आणि विधायक कार्यक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ही मिरवणूक यशस्वी करण्याकिरता समाजाचे आजी-माजी नगरसेवक माजी महापौर युवा कार्यकर्ते सहभागी होऊन यशस्वीरित्या पार पाडणार आहेत. ही मिरवणूक पाहण्यासाठी कर्नाटक,  आंध्र प्रदेश ,मराठवाडा ,मुंबई,  अंबरनाथ ,होटगी ,अक्कलकोट,  पिंपरी चिंचवड आदी शहरातील आणि सोलापूर शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. 

या पत्रकार परिषदेला परत उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र आसादे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते तथा मोची समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, नागनाथ कासोलकर, सिद्राम कामाठी, बसवराज म्हेत्रे,  नागनाथ म्हेत्रे, अंबादास नाटेकर आणि नरसिंग आसादे  आदी समाज बांधव उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments