Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी दि.23 डिसेंबर रोजी इज्तेमा....! समाधान नगर, अक्कलकोट रोड येथे होणार शानदार कार्यक्रम.....!!

 सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी दि.23  डिसेंबर रोजी  इज्तेमा....! 

समाधान नगर,  अक्कलकोट रोड येथे होणार शानदार  कार्यक्रम.....!! 



सोलापूर (कटू सत्य वृत्त): -भारत ही संतभूमी असून या संत परंपरेप्रमाणेच सुफी पंथ सुद्धा कार्यरत असून सर्वधर्मसमभावाची शिकवण देण्याबरोबरच सर्वांशी प्रेम आणि आपुलकीने राहण्याचा सल्ला कुराणग्रंथांमधून दिला जातो . अंधश्रद्धा रूढी परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी  खऱ्या अर्थाने शुद्ध ज्ञानाची गरज आहे. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत सत्य ज्ञान खरा संदेश पोहोचवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करतो. समाजाला खरा संदेश देण्यासाठीच अहले सुन्नत व जमाअत का सालाना  2 रा  इज्तेमा  शानदार वातावरणात दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी बाद असर से रात 10 बजे तक समाधान नगर अक्कलकोट रोड या ठिकाणी होणार असल्याची माहिती इरफान पिरजादे  आणि ऑफिस तनवीर नकशबंदी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषद पुढे बोलताना पिरजादे म्हणाले की, "राष्ट्रवादी निर्माण करण्यासाठी आणि समाजामध्ये ज्ञानाची गंगा उभा करण्यासाठी या धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आलं असून 100 वर्षातून हा कार्यक्रम होतो सोलापुरात हा दुसरा इज्तेमा  होत असून सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं यावेळी हाफिज तनवीर नकशबंदी यांनी दिली. खरा धर्म एकच असून तो धर्म म्हणजे मानवता धर्म असून तो मानवता धर्म टिकला पाहिजे यासाठी तरुणांनी व्यसनाधीनते पासून दूर राहिले पाहिजे. 

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याप्रमाणे कुरान ग्रंथा मधून शिकवण दिली जाते.  त्यामुळे  सर्वांशी प्रेम आणि आपुलकीने राहायला पाहिजे यासाठी माणसाचा ब्रेन वॉश झाला पाहिजे त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला असून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी बुरानपुर चे धर्मगुरू अहमद शरीफ साहब उपस्थित राहणार असून ते आपले धार्मिक प्रवचनातून आजच्या चालू घडामोडी विषयी विचार व्यक्त करणार आहेत. त्याचबरोबर विविध विषयावर सोलापूर शहरातील  6  मौलवी विविध विषयावर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी इरफान पिरजादे यांनी केले. 

या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने मागच्या कार्यक्रमाला चांगले सहकार्य केले यावेळेस ही चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. 

या पत्रकार परिषदेस हाफिज तनवीर नकशबंदी, हाफिज सय्यद साजिद रजा कादरी, जनाब इरफान पिरजादे, इमरान रजवी, निशाद अहमद, अफजल नुरी, अब्दुल गफूर अत्तारी आणि मुजाहिद चिश्ती आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments