Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर सिंहगड महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची ' बीएनवाय मेलॉन ' या नामांकित कंपनीत निवड लक्ष्मीपुत्र बिराजदार व पुजा हिंगण मिरे यांना वार्षिक १०.५३ लाख रुपयांचे पॅकेज

 सोलापूर सिंहगड महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची ' बीएनवाय मेलॉन

 ' या नामांकित कंपनीत निवड

लक्ष्मीपुत्र बिराजदार व पुजा हिंगण मिरे यांना  वार्षिक १०.५३ लाख रुपयांचे पॅकेज



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल यातील कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले **लक्ष्मीपुत्र बिराजदार व पुजा हिंगण मिरे** या दोन विद्यार्थ्यांची 'बीएनवाय मेलॉन' या नामांकित कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या  कंपनीमध्ये 'लक्ष्मीपुत्र बिराजदार व पुजा हिंगण मिरे' याची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घडवले जातात. यामध्ये कंपनीला आवश्यक असणारे ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेतली जाते. या परिश्रमामुळेच सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालया तील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत. चालू शैक्षणिक अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीपुत्र बिराजदार व पुजा हिंगणमिरे  'बीएनवाय मेलॉन '- वार्षिक पॅकेज १०.५३ लाख रुपये,  या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली.  लक्ष्मीपुत्र बिराजदार व पुजा हिंगणमिरे यांच्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य तथा मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.विकास मराठे, डॉ. प्रदीप तपकीरे, डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ. विजय बिरादार, डॉ. विनोद खरात,प्रा.सुरज धनवे सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निखत शेख आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



Reactions

Post a Comment

0 Comments