हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने उद्या विराट हिंदू गर्जना सभा...!
राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन....!!
शहर अध्यक्ष, रवि गोने,शहर संघटक आनंद मुसळे व शहर उपाध्यक्ष, विलास पोतू यांची माहिती...!!!
सोलापूर( कटू सत्य वृत्त): -धर्म जगला तर माणूस जगणार आहे. जगामध्ये हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आणि महान धर्म असून अनेक वर्षापासून हिंदुराष्ट्र सेना धर्म जागृतीचे काम करत असून त्याच धर्तीवर रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता कर्णिक नगर मैदानावर हिंदू राष्ट्र सेना सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने भव्य विराट हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख रवी गोणे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषद पुढे बोलताना गोने म्हणाले की', " जातीपातीत विभागलेला हिंदू संघटित आणि एकसंघ करणे हाच या सभेचा मुख्य उद्देश आहे. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची ही मागणी या सभेतून होणार आहे. या सभेला हिंदू राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई हे आपल्या खास शैलीत संबोधित करणार आहेत. हिंदुराष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे व विलास पोतू सभेची जय्यत तयारी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पूर्व जिल्हाध्यक्ष ह. भ. प. लक्ष्मण महाराज चव्हाण , आणि हिंदू राष्ट्र सेना महिला आघाडीच्या हर्षा ठाकूर यांचेही सभेला मार्गदर्शन होणार आहे. राष्ट्रभक्त उद्योजक बाबुभाई मेहता, सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अयोध्येत प्रभूश्रीराम लल्ला विराजमान होणार आहेत. या निमित्ताने अयोध्येहून आलेल्या 'मंगल अक्षता कलशा' च्या दर्शनाची व्यवस्था ही सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्ते घरोघरी संपर्क साधत आहेत.
या सभेत वक्फ बोर्ड कायद्याच्या नावाखाली साखर पेठेतील हिंदूचा होत असलेला अमानुष छळाचा विषय सभेत हायजॅक करण्यात येणार असून हा विषय गाजणार आहे. या ठिकाणी अनेक हिंदूंना पलायन करावे लागल्याने देसाई हे आक्रमक पवित्रा घेऊन घटनास्थळी भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हिंदू गर्जना सभेचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला असून या टीझर मध्ये देसाईंच्या "जातीय भेदाला थारा देऊ नका", हिंदू म्हणून एक व्हा. या एका प्रेरणादायी वाक्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. एकंदरीत हिंदू गर्जना सभा विराट आणि ऐतिहासिक अशी सभा होणार असून या सभेचे साक्षीदार होण्यासाठी तमाम हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .असे आवाहन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्ष विलास पोतू, श्रीकांत सुरवसे, रोहन सोमा,उपमहानगर प्रमुख लिंबाजी जाधव, अभिजीत अरळीकर, ओंकार दोडतले, अभिषेक जेटगी, विनायक नामाजी आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments