बारामतीत खजिना...! ठाण्यात चावी....!! अन् नागपुरात कुलूप....!!
कसा होणार राज्याचा विकास.....?
सोलापूर (दादासाहेब नीळ): -राज्यात प्रथम महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले .त्यावेळेस या सरकारची तीन चाकाची रिक्षा..! कधी पलटी मारेल सांगता येत नाही. अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तोच प्रयोग "फोडा आणि राज्य करा"हे रसायन वापरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमलात आणून ट्रिपल इंजिन सरकार राज्यात स्थापन केले. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाचे प्रमुख नेते फोडण्यात भाजपाला तूर्तास यश आले आहे. त्यामुळे भाजपाचा वारू सुसाट वेगाने धावू लागला आहे. तीन चुली एकत्र आल्यानंतर भडका उडतोच. तो भडका विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळेस निश्चितपणे उडण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून सर्व विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविला होता. कारण आजपर्यंतच्या इतिहासात नगर विकास खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. परंतु विश्वासाचा शिलेदार म्हणून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना या खात्याचे मंत्री केले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर सेनापतीला तोंडावर पाडत स्वतःच्या पदरात गुवाहाटी मार्गे जाऊन मुख्यमंत्रीपद पाडून घेऊन स्व पक्षाला आणि पक्षप्रमुखाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. एवढेच नव्हे तर ज्यांनी वाढवलं त्यांच्यावर सध्या सातत्याने वार करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला धन्य समजत आहेत. असे असले तरी दिल्ली शहराच्या मर्जीने पाणी पिण्याची वेळ या मुख्यमंत्र्यावर आली असून कोणताही निर्णय दिल्लीकरांना विचारूनच घ्यावा लागतो. मध्येच नागपूरकरांची ही मर्जी सांभाळावी लागते. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी एकही निर्णय स्वतः च्या पावर खाली घेतलेला नाही. हे विशेष.... !
कारण सध्या सरकारमध्ये बारामतीकर अजित दादा पवार यांनी एन्ट्री केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पानिपत होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे राज्याचा खजिना पुन्हा बारामतीत असून त्याची चावी ठाण्यात असली तरी कुलूप नागपुरातून उघडत असल्यामुळे विकासरुपी चाक सातत्याने पंचर होत आहे. सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून झालेल्या बीड मधील जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प का...? बसले. अंतरवाली सराटी येथील निष्पाप मुले आणि महिलांच्या वर पोलिसांनी लाटी चार्ज कोणाच्या आदेशाने केला...? सोलापूर येथे सापडलेले ड्रगचे कारखाने आणि त्याचा मास्टरमाईंड कोण...? या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाण्याऐवजी हे सरकार ट्रिपल इंजन असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने चार्ज करतात आणि त्यानंतरच ते बोलतात .असे आपल्याला विधान भवनामध्ये अनेक वेळा दिसून आले आहे. विधान भवन आणि राज्यातील सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास असणारे अभ्यासू येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाच्या थांबूत डेरी दाखल झाले असली तरी ते भाजपामध्ये जाण्याचे प्रमुख कारण वेगळे असल्याचे बोलले जात आहे.
पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्याचा खजिन्याची चावी स्वतःकडे घेण्यात यशस्वी झाले असले तरी कुलूप नागपूरमधून उघडत असल्यामुळे विना कुलपाची चावी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना सांभाळावी लागत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित दादा पवार यांना निधी वाटप करण्याचे स्वातंत्र्य उपमुख्यमंत्री असताना सुद्धा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे मी राष्ट्रवादी शिवसेनेचे पटत नसल्यामुळे नाईलाज असतो.
.jpg)
.jpg)
0 Comments