मोहोळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा धरणे आंदोलनाला पाठिंबा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 2, 2023

मोहोळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा धरणे आंदोलनाला पाठिंबा

 मोहोळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट

असोसिएशनचा धरणे मराठा आंदोलनाला पाठिंबा


 मोहोळ (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मोहोळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोहोळ तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनामध्ये सहभाग घेऊन लेखी स्वरूपात पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या उदात्त भूमिकेतून आम्ही हा पाठिंबा देत असल्याचे यावेळी केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशनच्या मोहोळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून नमूद केले. दिवसेंदिवस या धरणे आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा वाढत असून हे धरणे आंदोलनामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आणखी बळ आल्याची भावना यावेळी सत्यवान देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार, डॉ. प्रमोद पाटील, प्रमोद डोके, सत्यवान देशमुख, मनोज मोरे, अभयसिंह देशमुख, शाहूराजे देशमुख, नागेश भोसले, श्रीरंग लाळे, सोमनाथ पवार, सागर कोळी, तर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश विरपे, नागेश चौधरी, सचिन शास्त्री यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages