शिक्षण सहसंचालकांच्या चुकीचा!शिक्षकेतरांना फटका!दिवाळीत शिमगा करण्याची वेळ*
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीतील रक्कम जमा झालेले असताना सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र शिक्षण सहसंचालकांच्या चुकीच्या व गलथान कारभारामुळे फटका बसला असून त्यांच्यावर ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिक्षण सहसंचालकाच्या चुकीच्या कारभारामुळे अन्याय सहन करावा लागत आहे. त्यातच आता भविष्य निर्वाह निधीची पैसे वेळेवर भरले न गेल्याने दिवाळीच्या सणात शिमगा करावा लागत आहे. तसेच जे शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य व ग्रंथपाल यांना अजूनही सातवा वेतन प्रमाणे रक्कम मिळने बाकी आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रोखीतील फरक अद्याप मिळालेला नाही. प्राध्यापकांची दिवाळी गोड होत असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र कडू झाली असून वेळेत भविष्य निर्वाह निधी आणि अर्जित रजेचे व रोखीचे पैसे त्वरित जमा न केल्यास सोलापूर जिल्हा शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असा इशारा सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, जनरल सेक्रेटरी राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद होटकर, खजिनदार राहुल खराडे, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment