शरद पवार-अजित पवार भेट, तासभराची चर्चा
महाराष्ट्रात पुन्हा घडणार का राजकीय भूकंप...
राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र आले होते. आज पुण्यात शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजितदादा यांची भेट झाली. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत.
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांचं पुण्यातील बाणेर परिसरात निवास्थान आहे. आज दुपारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार पोहोचले होते. या तासभर चर्चा केल्यानंतर शरद पवार हे प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडले
दरम्यान, अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झालेत. अजित पवार दिल्लीत अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांना डेंग्यु झाला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसात ते दिसले नव्हेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता अजित पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कौटुंबिक भेटीत काय चर्चा झाली? दिल्ली भेटीचा उद्देश काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील.
.jpg)
No comments:
Post a Comment