Hot Posts

6/recent/ticker-posts

एम.के. फाऊंडेशनने दिला १००० कुटुंबांना दिवाळी फराळ

 एम.के. फाऊंडेशनने दिला १००० कुटुंबांना दिवाळी फराळ


भंडारकवठे (कटूसत्य वृत्त):- घराघरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना समाजातील वंचित घटकातील कुटूंबातील मुलांना दिवाळी कधी आली आणि कधी गेली हेच कळत नसते. अशा वचित घटकातील हजार कुटुबांची यंदाची दिवाळी सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनूरे यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे गोड होणार असल्याचे प्रतिपादन एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अश्विनी भोसले यांनी केले. याप्रसंगी मल्लिनाथ धुळखेडे, शरनू मुलगे, मनोहर माचर्ला, यमुनाथ मिस्किन, लक्ष्मण संभारम, गणेश संभारम, सागर दासरी, नितीन सकीनाल, श्रीनिवास बलभद्र, इरान्ना माचर्ला, देविदास यलदी, चितलय्या तातिकोंडा, सागर पाटील, राजू मागणूर, नागनाथ मादगुंडी, केशव गाली, व्यंकटेश अरगे, प्रभाकर मादगुंडी तसेच फाउंडेशनचे संचालक सदस्य यांच्यासह भागातील महिला उपस्थित होत्या. यावेळी कोगनुरे म्हणाले, दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाची मेजवानी असते, अशा वेळी आपल्या समाजातील एक घटक यापासून दूर आहे. याची जाणीव मला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांसाठी अव्याहतपणे सामाजिक काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments