वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने तीन डिसेंबर रोजी भव्य
राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा...!
अध्यक्ष राजशेखर विजापूरे यांची माहिती...!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): - वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून लिंगायत समाजातील सर्व पोट जातीचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा घेतला जातो. यंदाच्या वर्षी 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे 9 व्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषद पुढे बोलताना विजापुरे म्हणाले की, " गेल्या आठ वर्षात या वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून चार हजार सहाशे वधूवरांनी नोंदणी केली. आजपर्यंत 70 टक्के वधू-वरांची विवाह जुळले आहेत. वधू-वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून एका छताखाली अनेक उमेदवारांना एकत्र आणून आपला परिचय घडविणे. पालकांचा वेळ, पैसा, श्रम व जीवनाचा योग्य जोडीदार आपल्या मुलाला मिळावा यासाठी प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते.
3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर खरटमल उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदी निवृत्त पोलीस उपायुक्त दीपक आर्वे यांची निवड झाली असून कार्याध्यक्षपदी डॉ. प्रवीण पटणे यांची निवड करण्यात आली असून सहकार्याध्यक्ष म्हणून वीरेंद्र हिंगमिरे नियोजन करणार आहेत.
तरी इच्छुक वधू-वरांनी कुंभारवेष येथील लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात नोंदणी करावी आणि आपल्या जीवनाचा योग्य जोडीदार शोधण्यासाठी मिळावी यास उपस्थित राहावे असे आवाहन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस सिद्धय्या हिरेमठ, केदारनाथ उंबरजे, सुचित्रा थळंगे, प्रशांत धुम्मा, सुनील शरणार्थी आदी उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment