सुरज शिंदे यांची युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती...
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकी दरम्यान सुरज शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
सदर या बैठकीमध्ये सुरज शिंदे यांची सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पञ आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. सदर यावेळेस सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे,शहर उत्तरचे अध्यक्ष महेश लोंढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सदर सुरज शिंदे यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आले. व त्यांच्या निवडीबद्दल सर्व कौतुक केले जात आहे.
0 Comments