मोहोळ(कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील मलिकपेठ- दाईंगडेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील गटाचे मार्केट कमिटीचे माजी सभापती नागेश साठे, विजयकुमार पाटील यांच्या जय सद्गुरू संत बाळमामा व जय किसान ग्रामविकास आघाडीने सत्ता कायम ठेवली आहे. थेट जनतेतून सरपंचपदी गणेश मधुकर जगताप यांची तर नऊ जागांपैकी सहा जागांवर विजय मिळवून सलग चौथ्यांदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर विरोधी गटाला तीन जागेवर समाधान मानावे लागले. मलिकपेठ- दाईंगडेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत झाली होती. सरपंच पदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीमध्ये गणेश जगताप यांना ११५८ तर जयदीप बाबुराव दाईंगडे यांना ९९८ मते मिळाली तर नोटाला आठ मते मिळाली. गणेश जगताप यांनी १६० मतांनी विजय संपादन केला. प्रभाग निहाय विजयी सदस्य व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणेः प्रभाग १ मधून -लिंगदेव काळे (४३५), नागेश हजारे (४४१), विद्या कसबे (४४३), प्रभाग क्र. २ - बालाजी हजारे (४६५), मनीषा चवरे (४७५), सुजाता ढवळे (४७१), प्रभाग ३- पांडुरंग साठे (४२१), सुवर्ण हजारे (४२६), जयश्री कसबे (४६६) यांनी विजय संपादन केला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
0 Comments