सोलापूरकरांनो खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच करा...!
सेडा चे अध्यक्ष आनंद येमूल यांचे सोलापूरकरांना आवाहन....!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये प्रत्येक जण घरी बसून ऑनलाईन खरेदी करू लागल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊ लागल्यामुळे सोलापूर ची प्रगती थंडावू लागली आहे. सोलापूर आणि आपलं गेल्या अनेक वर्षापासूनचे जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि तेच टिकवण्यासाठी सोलापूरच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी तमाम सोलापूरकरांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच करावी असे आवाहन सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना येमूल म्हणाले की, " ऑनलाइन किंवा इतर प्रकारच्या खरेदीच्या तुलनेत ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेत खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. असे सांगताना आवडती वस्तू प्रत्यक्ष पाहता येते, त्याचे डायरेक्ट प्रात्यक्षिक घेऊन निर्णय घेता येतो. गरजेनुसार विविध मॉडेल्स एकाच वेळी प्रत्यक्ष पाहून खरेदी करणे हे केव्हाही ऑनलाईनच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते.
त्याचबरोबर विक्री पश्चात त्वरित सेवेची हमी असते. ऑनलाइन मध्ये मात्र धोका किंवा फार मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. इतर माध्यमाद्वारे खरेदी ही भुरळ पाडणारी असते त्यामध्ये आवडणारी वस्तू त्वरित न मिळता दोन-तीन दिवसांनी येते. याशिवाय बऱ्याच वेळा वस्तू खराब किंवा न आवडणाऱ्या वस्तू आल्याने त्या परत बदलण्यासाठी पाठवाव्या लागतात. त्यामध्ये विनाकारण वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होते. सर्व वस्तू दुकानात ऑनलाईन दारात उपलब्ध असून एलईडी साठी दोन ते तीन वर्ष वॉरंटी आहे तर फ्रीज साठी दहा ते वीस वर्ष आहे. तसेच शून्य टक्के व्याजदरात फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध.
सर्व कंपन्यांचे सर्विस सेंटर सोलापुरात असल्याने ग्राहकांना त्वरित सर्विस मिळते. स्थानिक दुकानदाराकडे नवीन ऑफर्स व 60% पर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहेत. याशिवाय ऑफर्स, लकी ड्रॉ ,खरेदीवर भेटवस्तू, आणि सोबत प्रत्यक्ष भेटीच्या तुलनेत व्हर्च्युअल ओळख दुय्यम ठरते. असे मत यावेळी सेडाचे
माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी व्यक्त केले. यावेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी मधील सविस्तर माहिती देऊन ऑनलाईन खरेदीच्या तुलनेत स्थानिक बाजारपेठेतून खरेदी फायद्याची आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी.असे आवाहन सचिव भूषण भुतडा यांनी केले.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉ. सुरज रतन धूत, सहसचिव हिरानंद कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, संचालक सर्वश्री गिरीष मुंदडा, यल्लाप्पा भोसले, चंद्रकांत शहापुरे, संदेश कोठारी ,राजेश जाजू ,बसवराज नवले, रवी पाचलगे, गणेश सूत्रावे, सह माजी अध्यक्ष कुशाल देढिया, केतन शाह, सतीश मालू, जितेंद्र राठी, दीपक मनोज, शिवप्रकाश चव्हाण, विपिन कुलकर्णी ,कौशिक शाह, समीर गांधी, दिलीप राऊत, आनंद दोशी आदी उपस्थित होते.
0 Comments