मराठा व ओबीसी समाजामध्ये विष पेरण्याचे काम करणाऱ्या छगन भुजबळचा जाहीर निषेध
पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या छगन भुजबळ यांनी मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचा जो घाणेरडा प्रकार केला आहे. त्याचा जाहीर निषेध.
अहो भुजबळ साहेब,
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडणारे चार पैकी तीन मंत्री हे ओबीसी समाजाचे होते....!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून.....पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे आत्मबलिदान देणारा आमचा बांधव विलास क्षीरसागर हा माळी समाजाचा होता.....! मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून मार्डी, तालुका उत्तर सोलापूर येथे आमरण उपोषण करणारा संजय खरटमल हा आमचा बांधव ढोर (SC) समाजाचा होता....... एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलगा असलेला मनोज जरांगे पाटील हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक आरक्षण मागणीसाठी गांधीवादी मार्गाने आमरण उपोषण करताना..... तुमच्या सरकारची दोन महिन्यात दोन वेळा दाना दान उडवून टाकली आहे...... मराठा क्रांती मोर्चा ची पवित्र चळवळ बदनाम करण्याचा आपण विडा उचललेला दिसतो...... बीडमध्ये तुम्ही म्हणता ओबीसींची घरे आणि दुकाने जाळली.... च्या पेक्षा जास्त घरे व दुकाने मराठा समाजाच्या नेत्यांची जाळली आहेत..... तुमची पोटदुखी ही आहे की मराठा समाजाने फुगीर ओबीसी आरक्षण हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध केले आहे.... त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोक आज मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला एकमुखी पाठिंबा देत आहेत...... मनोज जरांगे पाटील यांनी कधीही जाळपोळ, तोडफोड याचे समर्थन केलेले नाही...... भुजबळ साहेब आपण महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते आहात..... तुमचं हे वागणं बरं नव्हे....... तुमच्या या मराठाद्रोही वागण्याचा जाहीर निषेध....! जाहीर धिक्कार असो.....!
माऊली पवार,अध्यक्ष
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा
0 Comments