सोलापूर जिल्हा परीषद विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सुतार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- : सोलापूर जिल्हा परीषद विस्तार अधिकारी ( पंचायत ) संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कुर्डुवाडी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोलापुर जिल्हा परीषद अंतर्गत कार्यरत असणारे विस्तार अधिकारी यांची दि. ७ रोजी सोलापूर येथे बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल तोडकरी,सचीवपदी सोमनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला अशोक नलावडे, प्रमोद लोंढे, अरूण भुजबळ, औदुंबर शिंदे, नितीन वाघमारे, अविनाश थोरात, कमले पाटील, नवीन काले, ज्ञानेश्वर साळुंखे, अशोक डोके, दोडमणी, संजय पाटील, अक्षय शेंडगे आदींसह जिल्हयातील सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment