टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील वडोली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ना.तानाजीराव सावंत व प्रा.शिवाजीराव सावंत प्रणित तानाजी विठ्ठल गाडे-पाटील हे तिरंगी लढतीत सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.तसेच त्यांच्या पॅनलने सात पैकी चार जागा जिंकून ग्रामपंचायतवर ही निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. वडोली ग्रामपंचायत निवडणुकीत तानाजी विठ्ठल गाडे-पाटील,सतीस नवनाथ काळे-पाटील व दत्तू सुभाष माने यांच्यात तिरंगी निवडणूक झाली होती.यामध्ये तानाजी गाडे-पाटील यांनी बाजी मारली. या निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे रेश्मा सचिन माने,दत्तात्रय मच्छिंद्र भाग्यवंत,इंदूबाई साधू पडवळकर,राजेंद्र मच्छिंद्र मोरे हे चार सदस्य निवडून आले.तसेच प्रशांत गायकवाड यांच्या विक्रमदादा ग्रामविकास पॅनलचे प्रशांत सदाशिव गायकवाड,अर्चना बाळासो बागाव,अर्चना शंकर चव्हाण हे तीन सदस्य निवडून आले.निवडीनंतर विजयी झालेल्याचे ना.तानाजी सावंत,प्रा.शिवाजीराव सावंत आदींनी अभिनंदन केले.तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी आप्पासो बंडगर,अतुल चव्हाण,बाळासो बागाव,दयानंद मोरे,सुखदेव मोरे,सुरेश मोरे,अशोक बागाव,गोरख भाग्यवंत,जालिंदर भाग्यवंत,पंढरीनाथ भाग्यवंत,उत्तम माने,विजय माने, सतीश कांबळे, संजय कांबळे,बालाजी मस्तूदे,शंकर सुरवसे,कुणाल सुरवसे,गणेश सुरवसे, बाळू सुरवसे,राहुल गायकवाड, महादेव चव्हाण, प्रेम बागाव,उत्तम पडवळकर,धोंडीराम पडवळकर, ज्ञानदेव लोकरे,शिवाजी खडतरे, नागनाथ खडतरे,सुभाष लोकरे, सुभाष घुले,बापू वीरकर,दत्तू सुभाष माने आदीजन ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Top Ad
Thursday, November 9, 2023
Home
सोलापूर जिल्हा
प्रा.शिवाजीराव सावंत प्रणित तानाजी विठ्ठल गाडे-पाटील हे तिरंगी लढतीत सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले
प्रा.शिवाजीराव सावंत प्रणित तानाजी विठ्ठल गाडे-पाटील हे तिरंगी लढतीत सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
.jpg)
No comments:
Post a Comment