संविधान दिनाच्या औचित्य साधून जिव्हाळा गतिमंद व मतिमंद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 27, 2023

संविधान दिनाच्या औचित्य साधून जिव्हाळा गतिमंद व मतिमंद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप

संविधान दिनाच्या औचित्य साधून जिव्हाळा गतिमंद व मतिमंद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संविधान दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा मतिमंद आणि गतिमंद मुलांसोबत वालचंद महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाकडून संविधान दिन साजरा करण्यात आला. समाजात गतिमंद आणि मतिमंद असणाऱ्या मुलांसोबत संविधान दिन साजरा  करून वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रेरणा बनसोडे प्रतीक्षा शिंदे आणि ऋत्विक सोनकांबळे या एम समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने संविधान दिन साजरा केला. यावेळी जिव्हाळा गतिमंद आणि मतिमंद शाळेत मुलांसाठी त्यांच्या आय क्यू नुसार त्यांना ड्रॉइंग बुक आणि कलर बुक व सर्व प्रकारचे शालेय साहित्य आणि त्याचबरोबर त्यांना खाऊ वाटप करून संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

प्रथमता: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाला वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.निशा वाघमारे  यांची प्रमुख उपस्थिती होती.तर या कार्यक्रमाला डॉ.संदीप जगदाळे, डॉ.विजया महाजन ,डॉ.अस्मिता बेलगावकर प्राचार्य.आशालता रामजाने यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत जिव्हाळा गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये त्या मुलांच्या आय क्यू नुसार त्यांना ड्रॉइंग बुक, कलर बुक, विविध प्रकारचे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वालचंद महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्रेरणा बनसोडे, प्रतीक्षा शिंदे, ऋक्विक सोनकांबळे,विशाल घंटे, स्मृति वडवेराव,सुकन्या रामनवरे,गजल शेख,आतिश सोनवणे आदींची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा बनसोडे यांनी तर आभार प्रतिक्षा शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages