आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून पिलीव येथील साठवण तलावासाठी 9 कोटी 55 लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 10, 2023

आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून पिलीव येथील साठवण तलावासाठी 9 कोटी 55 लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता

राम सातपुते यांच्या प्रयत्नातून पिलीव येथील साठवण तलावासाठी 9 कोटी 55 लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता 



अकलूज (कटूसत्य वृत्त):-पिलिव  ता माळशिरस येथील महालक्ष्मी मंदिरा शेजारील व जमदाडे लवणं वस्तीलगत असणाऱ्या रूपांतरित साठवण तलावासाठी आ राम सातपुते यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 9 कोटी 55 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकिय मान्यता मिळविल्याने पिलीव आणि परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे

    माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांना सातत्याने निधी उपलब्ध करण्याकरिता आ राम सातपुते हे सतत प्रयत्नशील असतात नुकताच त्यांनी 25/ 15 योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध गावांना 5 कोटींच्या निधीची उपलब्धता करून दिली होती आणि लागलीच दोन दिवसात पिलीव महालक्ष्मी मंदिरा शेजारील रूपांतरित साठवण तलावासाठी 4 कोटी 85 लाख रुपये तर जमदाडे लवण वस्ती शेजारील रूपांतरित साठवण तलावासाठी 4 कोटी 70 लाख रुपये अशा एकूण 9 कोटी 55 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत 

        पिलीवपासून जवळपास 2.5 कि मी अंतरावर असणाऱ्या या भागातील लोकांना सातत्याने दुष्काळास सामोरे जावे लागत होते आसपासचा परिसर हा डोंगराळ असल्याने पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात होते मृद व जलसंधारण विभागाकडून आ राम सातपुते यांच्याकडे या दोन्ही रूपांतरित तलावांची दुरुस्ती करण्याबाबत मागणी करण्यात आली होती या मागणीचा आ राम सातपुते यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून पूर्वीपासून असणाऱ्या या तलावाची खोली करणे ,दुरुस्ती करणे, अच्छादन करणे ,पावसाच्या पाण्याने तलाव भरणे , आदी विविध उपाययोजना करून तलावाची साठवण क्षमता वाढवून जमिनीत पाणी मुरविणे या गोष्टी या माध्यमातून होणार असल्याने आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .

चौकट 

      पिलीव आणि परिसरातील विविध विकास कामांना आतापर्यंत जवळपास 18 ते 20 कोटी रुपयांचा निधी आ राम सातपुते यांनी उपलब्ध करून दिला आहे या अगोदर कधीही आम्हाला एवढा निधी उपलब्ध झालेला नव्हता कर्तव्य तत्पर व कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आ राम सातपुते यांनी  रूपांतरित साठवण तलावासाठी जवळपास 10 कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे भविष्यात या परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages