संस्कृती वर वरचढ विकृती
भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविधतेमध्ये एकता हेच भारताचे सर्वात मोठे व प्रभावी वैशिष्ट्य आहे. खाण पाण रहानी मानापासुन तर सन उत्सव संस्कृती प्रत्येक ठिकाणी विविधता आढळून येते. प्रत्येक समुदाय आपल्याला संस्कृती चे जतन करून आपापले सन उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करत असतो. कोणत्याही समुहाचे सन उत्सव असले तरीही सामाजिक वातावरणात आपुलकी, जिव्हाळा व आनंदाचे वातावरण असते. जसे इद असेल तर महिना भर मुस्लीम समाज आपल्या घरातील शिरखुर्मा आपल्या देशाबांधवाना मोठ्या आनंदाने आपुलकी ने देऊळ बंधुभाव जपत असतात. दिवाळी असेल तर हिंदु समुदाय महिनाभर चांगल्या फराळाची चव आपल्या देश बांधाना देत असतात. सन उत्सव साजरा करताना मनात चुकीचे विचार, दुसऱ्या बद्दल दुय्यम अथवा हिन भावना मनामध्ये येत नाही. मानसाला माणूस म्हणून बघितले जाते. व माणसाला आपुलकी ने आपल्या घरी केलेल्या मिठाईचा गोडवा आपुलकी ने दिला जातो. सन उत्सव च्या पद्धतीने साजरे होऊन समाजात शांतता, आनंद व एकोप्याची भावना असते तिच भावना जर वर्षभर प्रत्येकांच्या मनात असेल तर सामाजिक वातावरण दुषीत होणार नाही. कारण सामाजिक वातावरण दुषीत होण्याच्या घटना खुप वाढल्या आहेत. एकिकडे देशात अनेक सन उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपुन लोकांवर सामाजिक संस्कार घालुन माणुसकी ची शिकवण दिली जाते. परंतु सामाजिक वातावरण दुषीत करणारी विकृती येते तरी कुठून? सामाजिक विकृती पसरवणारे लोक आहेत तरी कोण? सामाजिक वातावरण दुषीत करून त्याचा फायदा नेमका कोणाला आहे आणि सर्वसामान्य लोकांचे सामाजिक वातावरण दुषित होऊन जी सामाजिक तेढ निर्माण होते त्यामध्ये काय नुकसान आहे. हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण वर्षे भर कितीही सन उत्सव साजरे केले आणि सन उत्सव साजरे करताना मनात कोणतेही विचार नसतानाही आपण समाजातील वास्तविक परिस्थिती डोळेझाक करू शकत नाही. कारण एकीकडे संस्कृती चे काटेकोर पणे जतन करणारे लोक असताना विकृती डोके वर काढत आहे. फक्त डोकेच वर काढत नाहीत तर या विकृती ने अनेकांचे सामाजिक व वैयक्तिक जिवन उद्ध्वस्त केले हे विसरून चालणार नाही. सन उत्सवाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देणारा भारत महान देश आहे, जेव्हा सर्वसामान्य लोक वैयक्तिक पातळीवर गावामध्ये जिवन जगतात तेव्हा कोणताही भेद न करता सर्व कामे एकदम व्यवस्थित होत असतात. एक काम दुसऱ्या कामावर अवलंबून असते आणि या कामाच्या साखळी मध्ये प्रत्येक जाती धर्माणे लोक जोडले गेलेले असतात. एवढे काही सुरळीत असताना मग अचानक एखाद्या ठिकाणी जातीय वाद होऊन जातीय दंगल होते, दुसरीकडे कुठेतरी धार्मिक वाद होऊन धार्मिक दंगल होते. आणि या दंगली मध्ये दोन्ही समुहाच्या तरुणांवर गुन्हे दाखल होतात. ज्या कारणासाठी दंगल झाली त्याबद्दल कोणालाच काही माहिती नसते परंतु एकदा तरुणांवर गुन्हे दाखल झाले की दोन्ही समुहाला कोर्ट कचरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. मानसिक व आर्थिक पिळवणूक होते. आज पर्यंत आनंदाने, प्रेमाने आपुलकी व बंधुभावाने वागणारे लोक एकमेकांचे शत्रु झालेले असतात. हे शत्रुत्व एका पीढीतुन दुसऱ्या पिढीत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक व आर्थिक नुकसान होऊन गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना शिक्षण नोकरी ला मुकावे लागते. म्हणजे आपण बंधुभाव व एकात्मतेने वागलो तर प्रेम, आपुलकी, कायम राहून मानसिक व आर्थिक हानी होत नाही. आणि एकतेने बंधूभावाने वागले पाहिजे हिच शिवकण संस्कृती आणि संस्काराच्या माध्यमातून मिळत असेल तर माणसाला माणसा पासून दुर नेण्याची व तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची विकृती समाजामध्ये का रुजत आहेत. धर्माची शिवकण व संस्कृती एवढी कमकुवत आहे की तीला कोणीही मोडून काढून त्याचा वापर करून घेईल? धर्म आणि संस्कार आपल्याला लहाधपणा पासुन बंधुभाव शिकवत असतील तर द्वेष भाव नेमका येतो कुठुन? धर्माच्या शिवणीपेक्षा, संस्कारापेक्षा स्वतः च्या फायद्यासाठी धर्माचा वापर करणारा लोकांनी ओळखु नये? काही मोजक्याच लोकांच्या सांगण्यावरुन धर्माची शिकवण व संस्कार पायदळी तुडवणे आपल्या नितीमत्तेमध्ये बसते? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. व धर्म आणि जाती याच्या नावावर राजकारण करून सत्ता भोगणारे लोक समाजात तेढ व द्वेष निर्माण होईल असे वातावरण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निर्माण करतात. राजकारणात बापावर विश्वास ठेवू नये असे सांगितले जाते तरीही लोक राजकारणी नेत्यावर विश्वास ठेवतात याचे कारण राजकीय नेते ज्यांना सत्ता भोगुन सर्वसामान्य लोकांचे आजही शोषण करायचे आहे. ते लोक वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक हाताशी घेऊन त्यांना जाती धर्माबद्दल एखादे वादग्रस्त विधान करायला लावतात. एकदा वादग्रस्त विधान झाले की महिना दोन महिने लोकांचे लक्ष मुख्य समस्येवर येत नाही. शिक्षण, रोजगार, नोकरी, आरोग्य सुविधा व महागाई विषय बाजूला जातात. आणि कोणत्या जातीचे वा धर्माचे बरोबर आहे यासाठी वैयक्तिक पातळीवर जाऊन टिकाटीप्पणी करणे, एकमेकांना दोष देणे, वेळप्रसंगी दंगल घडणे आणि दंगल घडली की सर्व सामान्य लोकांवर गुन्हे दाखल होतात. आणि ज्यांनी वादग्रस्त विधान केले ते राजकारणी, त्यांचे मुलं, त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या वर एकही गुन्हा दाखल होत नाही. गुन्हे दाखल कोणावर होतात तर भाऊच्या ऑफिस भोवताली दिवसभर फिरून भाऊंसाठी काय पण म्हणणाऱ्या तरुणांवर, गुन्हे दाखल होतात अभ्यास करून नोकरी साठी खटाटोप करणाऱ्या तरुणांवर जेव्हा भाऊंसाठी कायपण म्हणतो आणि भाऊसाठी, भाऊच्या बोलण्यामुळे स्वतः च्या अंगावर गुन्हे दाखल होतात तेव्हा मात्र भाऊंना जमानत घ्यायला, आधार द्यायला वेळ नसतो. हि वास्तविक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एकिकडे जनता व दुसरी कडे घाण केलेले राजकारण हे दोन आज वेगवेगळे आहे. अर्थात राजकारण योग्य पद्धतीने व जनतेच्या व देशाच्या हितासाठी केले तर भारत जगातील स्वर्ग बनेल असे वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायधिशांनी केले होते. परंतु राजकारण चुकिच्या लोकांच्या हाती गेल्याने आणि राजकारणात लोकांच्या समस्या चा विचार न करता जाती धर्मावर राजकारण केल्याने राजकारणाची नैतिक पातळी खालावली आहे. म्हणजे सर्वसामान्य मानसाचा धर्म व राजकीय नेत्यांचा धर्म एक होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. लोकांचा धर्म असतो एकमेकांना साह्य करून, एकमेकांच्या अडी अडचणीमध्ये धावून जाने व मदत करणे. राजकीय नेत्यांचा धर्म असतो जनतेच्या हक्काचे खाने, मानसा माणसात वाद निर्माण करणे व लोकांच्या समस्या वाढवणे. सर्व सामान्य लोकांची संस्कृती व संस्कार वेगळे आहेत, राजकीय लोकांचे संस्कृती व संस्कार वेगळे आहेत. सर्व सामान्य जनतेने शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, महागाई हक्क अधिकार यावर बोलु नाही म्हणून लोकांमध्ये फुट पाडली जाते जाती धर्माच्या नावावर लढवले जाते. परंतु राजकीय सत्तेतुन स्वतः चे खरे भरण्यासाठी सर्वजन एकत्र येऊन जनतेची लुट करतात. भाऊ, नाना, दादा अण्णासाठी लोक रस्त्यावर येऊन प्रचार करतात, डोक्यावर घेतात, परंतु लोकांना जेव्हा भाऊ, दादा अण्णा यांची गरज असते तेव्हा ते मात्र रस्त्यावर कधीच दिसत नाहीत हि वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन जागृत होणे आवश्यक आहे. पुर्वी पासून चालत आलेली संस्कृती, संस्कार हे केवळ राजकारणी लोकांसाठी पायदळी तुडवणे योग्य नाही. आपण सध्य परिस्थिती जरी बघितली तरी लहानातील लहान विषय मोठ्यात मोठा करून त्यामध्ये जातीय तेढ निर्माण करून एका जातीचा शत्रु दुसरी जात दाखवली जात आहे. अर्थात ही सर्व मांडणी राजकीय क्षेत्रातुन केली जाते. आपण ज्या धर्मात राहतो, ज्या धर्माने आपल्या वर संस्कार घातले त्या धर्माची अशी शिवकण आहे का आपल्याच धर्मातील जात आपल्याच धर्मातील जातीची शत्रु आहे? राजकिय नेते धर्म व जातीचा वापर त्यांच्या फायद्यानुसार करून घेऊन सत्तेची पोळी भाजून जनतेला मात्र उपाशी ठेवत आहेत. हे विसरून चालणार नाही. नेत्यांचे मुलं विदेशात शिक्षणाला आहेत. येथे लोकांकडे फि भरायला पैसे नाहीत. नेत्यांची मुल शिक्षण घेतांना करोडोचे मालक आहेत, येथे मेहनत करून बँक बँलन्स नाही, नेत्यांचे घरे हजारो करोडो रुपयांचे आहेत येथे सर्वसामान्य लोकांच्या घराची विट बदलने होत नाही, बऱ्याच लोकांकडून घरावरचे पत्रे बदलने होत नाहीत. राजकीय नेत्यांच्या शेतात करोडो रुपयांचा माल होतो शेतकरी रात्रंदिवस घाम गाळतो वर्षाकाठी त्याला मजुरीही उरत नाही. जनतेला लुटणाऱ्या, जनतेच्या धार्मिक पणाचा फायदा घेऊन सर्वसामान्य लोकांचे भविष्य उध्वस्त करण्याबाबत बोलले तर साहेबांच्या विरोधात बोलु नका म्हणणारे हि सर्वसामान्यच असतात. परंतु साहेब जनतेचा पुर्ण निधि लाटतो, शिक्षण नोकरी दवाखान्याचे खाजगीकरण होते तरीही बोलत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तरीही तोंडुन शब्दही काढत नाहीत अशा या साहेबांच्या वागण्याला संस्कृती म्हणायचे का विकृती? देशात अनेक सन उत्सव असतात. प्रत्येक व्यक्तीला अस वाटतं आपण आनंदाने उत्सव साजरा करून परिवारासोबत दोन घास चांगले खावे. पण आर्थिक परिस्थिती नाही. हि बाब लक्षात घेऊन सरकारने गरीबीची थट्टा केली आणि आनंदाचा शिक्षा म्हणून राशन मधुन काही खाद्यपदार्थ देशातील करोडो परिवारांना दिला जातो. राजकीय नेत्यांनी एक दिवस तरी आनंदाचा शिधा घेऊन आपल्या कुटुबांसोबत सन उत्सव साजरा करून दाखवावा. आनंदाचा शिधा नावाखाली गरीबांची चेष्टा सुरू आहे. एकिकडे दादा भाऊच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात आनंदाचा शिधा वाटला जातो. दुसरीकडे दादाची भाऊची संपत्ती शेकडो करोडो रुपये होऊन बसली हे कस शक्य आहे? नेमकी कोणती कमाई असते ही? आणि यालाच संस्कार म्हणायचे का? हा मुळ प्रश्न मात्र अजूनही कायम राहतो. दिवाळी हा सन सर्वात मोठा व प्रतिष्ठेचा मानला जातो. हा सन साजरा करायला कितीही लोकांनी कर्ज काढून सनाची तयारी केली आहे. एकिकडे वेगवेगळ्या कंपनीने, बँकांचे कर्ज व दुसरी कडे सनासाठी पुन्हा कर्ज खरंच त्या कुटुंबाला खरात बनवलेल्या नैवद्यात मनापासून आनंद मिळेल का? कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना शांत झोप तरी लागेल का? अशा अनेक समस्या समोर आहेत. म्हणून सर्वसामान्य लोकांनी जागृत होऊन राजकारणी लोकांकडून धर्म व संस्कृती शिकु नये. कारण तेथे धर्माच्या नावाखाली विकृती पसरवून जनतेला समस्या ग्रस्त केले जाते. उलट जनतेने एकत्र येऊन शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा महागाई विषयी प्रश्न विचारावे, शेतमालाला भाव माघावा आणि आपल्या संस्कारानुसार एकता व बंधुतेने वागावे तरच आपण वर्षभर सन उत्सव साजरे करून जो संदेश देतो तो सार्थक होईल व प्रत्येक घरात वातावरण आनंदीत राहील.
.jpg)
No comments:
Post a Comment