आरोग्य विद्यापीठात धन्वंतरी पूजन
नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात धनत्रयोदशी निमित्त प्रति-कुलगुरु वैद्य. मिलींद निकुंभ, यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., समवेत परीक्षा नियंत्रक डाॅ. संदीप कडू, वाय जी पाटील, आदी आधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगीतले की, आरोग्य व धनाची देवता धन्वंतरीच्या कृृपेने सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करते. सुदृृढ आरोग्य व मानसिक समाधान हा महत्वपूर्ण घटक आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आरोग्यदायी आयुष्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ धन्वंतरी देवतेची पूजा करण्यात आली. याप्रसंगी डाॅ. गितांजली कार्ले, डाॅ. अनुश्री नेटके, डाॅ. श्वेता चैधरी, जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्नील तोरणे, ज्योती खांडे, मेघा बोरसे, शितल आभाळे आदी अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment