माढ्यात प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 18, 2023

माढ्यात प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

  माढ्यात प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत राज्यातील १०० हुन अधिक संघाचा सहभाग,महाराष्ट्र स्पीकर्स

 संघ ठरला सेना चषकाचा मानकरी 



माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या हायटेक युगात सर्व काही बदल घडत आहेत.मात्र मैदानी क्रीडा प्रकाराकडे देखील आजच्या तरुणांनी लक्ष द्यायला हवे.कारण मोबाईल च्या  जमान्यात शारिरीक  व्यायाम होणारे क्रीडा  प्रकाराचे जतन होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.

 माढा शहरात रिस्क ग्रुप च्या वतीने सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांंच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेच्या उद्घघाटन प्रसंगी प्रा.सावंत बोलत होते.या स्पर्धेत सोलापूर सह पर जिल्हातील अनेक  संघानी सहभाग नोंदवला.महाराष्ट्र स्पीकर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावत "शिवसेना चषक" पटकावला.रिस्क ग्रुप चे अध्यक्ष अरविंद खरात यांनी प्रास्ताविकातुन स्पर्धा घेण्या मागचा उद्देश मांडला. प्रा.शिवाजीराव सावंत व भैरवनाथ शुगर्सचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांच्या प्रमुख  हस्ते मैदानाचे पुजन करुन स्पर्धेचे उद्घघाटन पार पडले. यावेळी कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे,जिल्हा दुध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे,माजी जि.प.सदस्य आनंदराव कानडे,शिवसेनेच तालुकाप्रमुख मुन्ना साठे,अरविंद खरात,पृथ्वीराज खेडकर,स्वप्नील खरात,मधुसूदन गायकवाड,विजय घोगरे,ऋषीकेश कानडे,ओंकार भांगे,आनंद भिसे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विजेते ठरलेले संघ-प्रथम क्रमांक  महाराष्ट्र स्पीकर्स संघाने पटकावत शिवसेना चषक पटकावत २१ हजार रोख व ट्रॉफी देण्यात आली.द्वितीय क्रमांक  ABSF pune भारती विद्यापीठ,तृतीय क्रमांक वाढवणा व्हॉलीबॉल संघ तसेच बेस्ट प्लेअर - संकेत पाटील,बेस्ट लिफ्टर -अमित गोसावी बेस्ट लीबेरो -राज पाटील या सर्व  विजेत्या ठरलेल्या संघ व खेळाडूंना ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन  मान्यवरांच्या उपस्थितीत 
गौरविण्यात आले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages