बेवारस बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 18, 2023

बेवारस बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 बेवारस बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

30 दिवसाच्या आत पाखर संकुल बालगृह जुळे सोलापुर किंवा जिल्हा

 बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे( 7219104503) यांच्याशी संपर्क

 साधावा

सोलापूर,(कटूसत्यवृत्त):- कु. पिनी देवकते, वय वर्षे 07 ही बालिका सांगोला पोलीस स्टेशन यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने दि. 24 डिसेंबर 2021 रोजी व  राधिका राजु निंबोळे, वय वर्षे 12 ही बालिका एमआयडीसी पोलीस स्टेशन व चाईल्ड लाईन यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापुर यांचे आदेशाने दि. 18 जानेवारी 2023 रोजी  तसेच कु. मल्ली, वय वर्षे 10 ही बालिका लोकमार्ग पोलीस स्टेशन व चाईल्ड लाईन यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने दिनांक 14 जुलै 2022 रोजी जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह या संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

  तरी बाळाच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, ही माहिती प्रसिद्ध झालेपासुन 30 दिवसाच्या आत  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे संपर्क क्र. - 7219104503 किंवा बाल कल्याण समिती, जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह/बालगृह, 937/9,नार्थ सदर बझार,सोलापूर यांचेशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages