दि आर्ट ऑफ लिव्हिंग" तर्फे 20 ऑक्टोबर पासून हेरिटेज मध्ये होम चे प्रथमच आयोजन...!
रविवारी होणार श्री. महा चंडी होमा...!!
प. महाराष्ट्र समन्वयक लक्ष्मण भंडारी यांची माहिती...!!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -प. पू. श्री. श्री. रविशंकर जी स्थापित दि आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्म संस्थान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात प्रथमच" "वैदिक शारदीय नवरात्रोत्सव" निमित्त दिनांक 20 21 आणि 22 ऑक्टोबर 2023 रोजी विविध होम आणि पूजा आणि रविवारी महा चंडी होमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र समन्वयक लक्ष्मण भंडारी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना भंडारी म्हणाले की, " अनेक वर्षापासून मागणी केल्यानंतर सोलापुरात प्रथमच वैदिक धर्म संस्थानच्या माध्यमातून हा विशेष धार्मिक कार्यक्रम होत असून हा कार्यक्रम दि हेरिटेज "सी" लाँन होटगी रोड, गांधीनगर, सोलापूर येथे होणार असून हे होम स्वामी चिदाकाश यांच्या सानिध्यात होत आहेत ही सोलापूरकरांसाठी अतिशय दुर्मिळ आणि दुग्ध शर्करा योग आहे.
हे सर्व विधी करण्यासाठी बेंगळुरू स्थित वेद विज्ञान महाविद्यापीठ येथील प्रशिक्षित बी सत्यनारायण, हरीगणेश व चार पंडित सोलापुरात येत आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता" महा गणपती होम, श्री. नवग्रह होम, श्री. वास्तुशांती होम " आणि सायंकाळी सहा वाजता" महा सुदर्शन होम" होणार आहे. या महा सुदर्शन होमा मध्ये साधक सुदर्शन क्रिया करून आपली साधना परिपूर्ण करतात. हा सोहळा पाहायला मिळणार आहे. शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता" महा रुद्र होम" आणि सायंकाळी कलश स्थापना आणि दुर्गा सप्त शतीचे पारायण होत आहे. आणि रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेसात वाजता हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य असा" महा चंडी होम" होणार आहे. जो या सर्व विधीतील अतिशय महत्त्वाचा होम आहे.
या सर्व होमानंतर सत्संग, विविध कलागुणांचे कार्यक्रम होणार असून युवकांसाठी दांडिया आणि गरबा यांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. स्वामी चिदाकाश हे जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ गुरुदेव रवी शंकरजी यांच्या सानिध्यात असून, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. आणि त्यांचे चरण स्पर्श सोलापूर शहराला होणार असल्याने सोलापूरकरांचे भाग्य यामुळे उजळणार आहे. त्यांनी युरोप व विविध देशांमध्ये आर्ट ऑफ लिविंग ची असंख्य शिबिरे घेतली आहेत. आणि त्यांच्याच परम पावन सानिध्यात हे सर्व होम होत आहेत. या सर्व होमांची फलिते वेगवेगळी आहेत, असे होम आणि पूजांमधील मंत्रोच्चार आणि विविध हवनांमुळे मानवी जीवनातील मानवी मनातील ताण/ तणाव कमी होण्यास मदत होते. नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते तसेच सभोवतालच्या वातावरणाची शुद्धी होण्यास मदत होते. मन सद् विचार आणि सदगुणाकडे धाव घेते. मन आणि तन समाधानी होते. या बाबी आता शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झाल्या आहेत. अशा होम मध्ये उपस्थित त्यांना गहिऱ्या ध्यानाची अनुभूती येते. महाप्रसाद वाटप करून उत्सवाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम प्रथमच होणार असून हे सर्व होम सर्वांसाठी खुले असून, या सर्व होम आणि पूजांना सर्व सोलापूरकरांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन" दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे" पश्चिम महाराष्ट्र समन्वयक लक्ष्मण भंडारी यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला अंबादास कोकत्ती, श्रीनिवास सादुल पुरण चंद्र पुलगम, आशा मेहता, गिरीश गोरे अभय अंबर, राजू जुंजा आणि व्यंकटेश आडम आदी उपस्थित होते.
0 Comments