दिवाळी पुर्वी राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाना देय रकमा नाही दिल्यास मुबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण करतील- शिवानंद भरले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 17, 2023

दिवाळी पुर्वी राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाना देय रकमा नाही दिल्यास मुबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण करतील- शिवानंद भरले

 दिवाळी पुर्वी राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाना

 देय रकमा नाही दिल्यास मुबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण

 करतील- शिवानंद भरले  


पुणे (कटूसत्य वृत्त):- राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे निवृत्तीनंतरचे रकमा दिवाळी पुर्वी नाही दिल्यास दिवाळीचा पहीला आघोंळ मुबंई मंत्रालयासमोर करण्याचा ईशारा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी राज्य शासनाला दिली आहे.

          राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे नोव्हेंबर 2022 ते आजतागायत पर्यंत देय असलेले ग्रॅज्यूटी व पेन्शन विक्री रक्कम रू 27-30 लाख रूपये अद्यापर्यंत दिली नाही या पुर्वी 2 ऑक्टोबंरला पुणेच्या शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तेव्हा अपुरे निधी देऊन शासन बोळवण केली  अजून नोव्हेंबर 2022 ते आजतागायत रिटायर झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकाना शासन दमडी ही दिली नाही

            ग्रॅज्यूटी व पेन्शन विक्री रक्कम या सेवानिवृत्ताचे हक्काचे रकमा आहेत शासन वेळेत देत नाही वयस्कर शिक्षकांचे हाल करीत आहेत जर दिवाळी पुर्वी नाही दिल्यास दिवाळी चा पहीला आघोंळ मुबंई मंत्रालयासमोर करण्याचा ईशारा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिला आहे. शिवाय राज्यातील 25000 सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या कुटुबातील सदस्य  निवडणूकीत वेगळा विचार करतील तर सेवानिवृत्ताना मिळणार्या रकमेसाठी व्याज मागणीचा न्यायालयात दाद मागणीचा ईशारा शिवानंद भरले यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages