पंढरीत मंगळवारी काँग्रेसची बैठक आ. प्रणितीताई शिंदे करणार मार्गदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 16, 2023

पंढरीत मंगळवारी काँग्रेसची बैठक आ. प्रणितीताई शिंदे करणार मार्गदर्शन

 पंढरीत मंगळवारी काँग्रेसची बैठक

आ. प्रणितीताई शिंदे करणार मार्गदर्शन


पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष  आ. प्रणितीताई शिंदे या मंगळवारी पंढरपूर दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती, पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातील मरगळ दूर झाली आहे. राजकीय फुटीपासून हा पक्ष अलिप्त राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाची क्रेझ जनमानसात टिकून आहे. सन २०२४ सालात येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक मंगळवारी पंढरपूरमध्ये होत आहे. काँग्रेस पक्षाचे पक्षसंघटन वाढविणे, याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. ही बैठक मंगळवार दि. १७ ऑक्टोबर रोजी, येथील कॉलेज रोडलगत असणाऱ्या हॉटेल धनश्रीच्या धनश्री हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीस पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, काँग्रेसच्या सर्व विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी याशिवाय शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे, तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी केले आहे

पंढरपूरमध्ये होणारी ही काँग्रेसची बैठक पुढील काळासाठी महत्त्वाची ठरणार असून, या बैठकीतून काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार समोर येण्याची चिन्हे आहेत. पंढरपूरमध्ये होणारी काँग्रेसची ही बैठक पंढरपूर तालुक्याला बरेच काही देऊन जाणारी ठरेल, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages