'बाबां' च्या विजय संकल्प मेळाव्यात 'मालकां' चा जंगी शक्ती प्रदर्शन!
*दक्षिण विधानसभेचे पद वाटप करत लोकसभेसाठी युवक काँग्रेसचे महेश जोकारे यांच्याकडून मोर्चे बांधणी...!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त) - सध्या संपूर्ण शहरासह राज्यामध्ये काँग्रेससाठी चांगले वातावरण असल्यामुळे काँग्रेसची विचारधारा जनमानसात पोहोचवण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली सोलापुर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे आयोजित सोलापुर शहर युवक काँग्रेसच्या माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व त्यांचा सत्कार कार्यक्रम काँग्रेस भवन सोलापुर येथे संपन्न झाला. दक्षिण सोलापूर विधानसभेचे अध्यक्ष इंजि. महेश जोकारे, अंबादास बाबा करगुळे, माजी नगरसेवक विनोद दादा भोसले आणि बु. गौरव दादा खरात यांच्यात एक विशेष बंधुता आणि मित्रता असल्या कारणाने, जोकारे यांनी करगुळे यांच्या कार्यक्रमात आ. प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते दक्षिण विधानसभेची पद वाटप करत शक्तिप्रदर्शन केले. आपल्या भाषणात बोलताना जोकारे बोलले की, 'फक्त प्रणिती ताईंना, भावी खासदार बोलून चालणार नाही तर त्यासाठी बूथ पर्यंत आम्हा युवकांना पोहोचावे लागेल. युवक काँग्रेसच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने दिवसाच रात्र करून मत मिळविले अगदी त्याच पद्धतीने, झपाटून आपल्या ताईसाठी पळण्याची गरज आहे.'
जनवात्सल्य येथे जाऊन नवीन पदाधिकाऱ्यांची व माजी केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्याशी तोंडओळख देखील जोकारे यांनी करून दिली .आणि लोकसभेला प्रणिती ताईंसाठी 'रक्ताचं पाणी करून दाखविण्याची भूमिका' स्पष्ट केली. यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे देखील उपस्थित होते.
आ. प्रणिती ताई शिंदे यांच्या परवानगीने दक्षिण सोलापूर विधानसभेची पहिल्या टप्प्यातील पदे पुढील प्रमाणे आहेत.
उपाध्यक्ष
आकाश पुजारी - भंडारकवठे
राजरत्न गावडे - मंद्रूप
सरचिटणीस
अप्पालाल शेख - निंबर्गी
इरेष बिराजदार - कारकल
सचिव
तरबेज शेख - आंत्रोळी
राजेश उमदिकर - विंचूर
सहसचिव
परमेश्वर सुरवसे - अकोले मंद्रूप
जीलानी मुजावर - गुंजेगाव
नारायण पाटील - वडापुर
काशिनाथ पाटील - खानापूर
चन्नवीर पाटील - येळेगाव
अमोल पवार - बसवनगर
अभिमान साळुंखे - अकोले मंद्रूप
मंद्रूप शहर अध्यक्ष - तोसिफ शेख

0 Comments