Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सुरू असलेली भक्तसेवा ही उल्लेखनीय - अभिनेता देवदत्त नागे

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सुरू असलेली भक्तसेवा ही उल्लेखनीय - अभिनेता देवदत्त नागे

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भक्तसेवा ही उल्लेखनीय आहे, येथील महाप्रसाद पूर्ण ब्रह्मची साक्ष देणारे असल्याचे मनोगत अभिनेता देवदत्त नागे यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आल्या असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंडळाचे पुरोहित संजय कुलकर्णी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, दत्ता माने, निखिल पाटील, संजय गोंडाळ, राहुल इंडे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments