Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरापुर (सो) येथे सकाळी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, तर संध्याकाळी कॅण्डल मार्च. ''हम सब जरांगे, करेंगे या मरेंगे'' चा एल्गार.

 शिरापुर (सो) येथे सकाळी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, तर संध्याकाळी कॅण्डल मार्च.

''हम सब जरांगे, करेंगे या मरेंगे'' चा एल्गार.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या ''आमरण उपोषणाच्या'' समर्थनार्थ मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी शुक्रवारी सकाळी घेण्यात आलेल्या बैठकीत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला. हम सब जरांगे करेंगे या मरेंगे असा एल्गार करत सायंकाळी ७ वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला.या कॅन्डल मार्चला गावांमधील हनुमान मंदिरापासून  सुरुवात करण्यात आली.

  '' कोण म्हणतंय देत नाय ,घेतल्याशिवाय राहत नाय , आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय भवानी, जय शिवरायांचा नारा यावेळी देण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणत्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांना निमंत्रित करायचे नाही, आणि त्यांनी बोलावलं तरीही आपण जायचं नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

या कॅन्डल मार्चला गावातील वयोवृद्ध नागरिकांपासून ते लहान मुलापर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती. या कॅन्डल मार्चमध्ये महिला वर्गांची संख्याही लक्षणीय होती.

30 ऑक्टोबरच्या मोहोळ आंदोलनाला मोठ्या संख्येने जाणार.

मोहोळ तहसील आवारामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये दररोज एका गावचे नागरिक सहभागी होत आहेत 30 ऑक्टोबर रोजी शिरापूर येथील सकल मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे सर्व मराठा समाजाच्या वतीने या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठरले असल्याने शिरापूर मधून किमान तीन ते चार हजार नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होतील.

Reactions

Post a Comment

0 Comments