मोहोळ तालुक्याच्या रणरागिनीने हजारो मोडलेले संसार जोडले...!!
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती थाप टाकून नुसतं लढ म्हणा..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबात जगणाऱ्या कांताबाई मच्छिंद्र गुंड या गेल्या 23 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत आहेत.
त्यांनी आजवर जवळपास 3000 च्या पुढे मोडलेल्या संसार जोडून फार मोठं पवित्र कार्य केलेलं आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी गावासाठी तंटामुक्त समितीचा पुरस्कार त्याचबरोबर गावातील व्यसनाधीन तरुणांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी हिवरे गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच त्यांचं कार्य संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरल्यामुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे


0 Comments