आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 2, 2023

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न

 आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न 



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्ष डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. यावेळी संस्थेची व महाविद्यालयाची माहिती  विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरिज कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार उपस्थित होते. प्रा. संजीवनी कुटे यांनी कार्यक्रमाची सुरुवात करून प्रास्ताविक मांडले व सूत्रसंचालन केले. प्रा. अमर डोके पाटील यांनी पावर पॉईंट प्रझेंटेशन वरुन  डी फार्मसी कोर्स बद्दल माहिती दिली  तसेच आजपर्यंत कॉलेजमध्ये झालेले उपक्रम, जयंती, कल्चरल ईव्हेंटसची माहिती दिली. डॉ. मिथुन मानियर यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील करियरच्या संधी याविषयी व्यापक मार्गदर्शन केले तसेच फार्माकोव्हिजिलन्स व मेडिकल कोडिंग या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती दिली  व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन करताना महाविद्यालयाची शिस्त, महाविद्यालयाची  विद्यार्थ्यांविषयी असणारी भूमिका स्पष्ट केली तसेच सर्व  विद्यार्थ्यांचे फार्मसी हा अभ्यासक्रम निवडल्याबद्दल अभिनंदन केले. 
सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे व संस्थेच्या मार्गदर्शिका प्राणिता शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी  शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रा. तुषार कन्हेरे, प्रा. संग्राम अनपट भोसले, प्रा. साक्षी देवकर व  सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व  विद्यार्थ्यी उपस्थित होते. कार्यकर्माचे आभार प्रदर्शन प्रा. संग्राम अनपट भोसले यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages