ऊरूळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर शिंदवणे गावाजवळ गतिरोधक
बसवा अन्यथा उपोषण
हवेली(कटूसत्य वृत्त):- ऊरूळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर शिंदवणे गावाजवळ दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत असून येथे दहा दिवसांमध्ये शिंदवणे गावाजवळ राज्यमहामार्गावर गतिरोधक बसवणे व रस्त्याच्या कडेने ड्रेनेज लाईनटाकण्याचे काम त्वरित सुरू करावे ,अन्यथा दहा दिवसानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिंदवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.ज्योती महाडिक व शिंदवणे चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य गणेश महाडिक यांनी दिला आहे. उरुळी कांचन ते जेजुरी राज्य मार्ग ११७क्रमांक या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे ठेकेदारा मार्फत काम केलेले आहे .या रस्त्यांचे काम ठिक ठिकाणी अंत्यत नित्कृष्ट दर्जाचे झाले असून पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी साचले . या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या अपघातामध्ये काही जणांना कायमचे अपंगत्व आले असून काहींना आपला जीव गमाववा लागला आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित शिंदवणे परिसरात रस्त्यावर गतिरोधक टाकण्याचे काम करावे व त्यावर पांढरे पट्टे मारावे रस्त्याच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम त्वरित सुरू करावे.
अन्यथा येथे दहा दिवसांनी शिंदवणे ग्रामस्थासह शिंदवणे येथील खंडोबा मंदिराजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा शिंदवणेचे सरपंच सौ. ज्योती महाडिक व शिंदवणे चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य गणेश महाडिक यांनी दिली आहे.

0 Comments