तडवळे येथे स्वच्छ भारत मिशन उपक्रम साजरा
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे एक ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत गावामध्ये सकाळी दहा ते अकरा या वेळेत ग्राम स्वच्छता अंतर्गत स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान मोहीम राबवण्यात आली .
या साठी सकाळी ग्रामपंचायत कसबे तडवळे येथे सरपंच स्वाती जमाले,ग्रामसेवक आडे,ग्रामपंचायत सर्व सदस्य, गावातील जि.प.आदर्श कन्या शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक केशव पवार जेष्ठ शिक्षक जगन्नाथ धायगुडे व दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक बंधू,भगिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आशाताई ,सफाई कामकार ,स्वयंसेवक ,पालक , ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वा ग्रामपंचायत पासून ते कन्या शाळेपर्यंत एक तास श्रमदान करून परीसर व सार्वजनिक ठिकाणे येथे स्वच्छता करण्यात आली. व कचरा घंटागाडीत भरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी लागणारे स्वच्छता साहित्य ग्रामपंचायत कडून पुरवले गेले . त्याचप्रमाणे तणनाशकाची फवारणही करण्यात आली. ठीक 11 वा ग्रामपंचायत कडून उपस्थित सहभागांचे आभार मानून यशस्वी उपक्रमांची सांगता करण्यात आली .

0 Comments