जगदंबा सूतगिरणी चे कामगार रखडलेल्या पेन्शन प्रश्नी आक्रमक,१०
वर्षापासुन देताहेत लढा, सोलापूरात सामुहिक आत्मदहन
करण्याचा कामगारांनी दिला इशारा
|माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील जगदंबा सूतगिरणी चे कामगार रखडलेल्या पेन्शन प्रश्नी आक्रमक पवित्र्यात उतरले आहेत. मागील १० वर्षापासुन कामगार पेन्शन मिळत नसल्याने लढा देत आहेत.कामगारांनी सोलापूरात सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. खासदार,आमदार यांचेसह कोणताही लोकप्रतिनिधी गिरणी कामगारांच्या पेन्शन प्रश्नी आवाज उडवताना दिसत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री यांचेसह सर्व वरिष्ठ अधिकारी यांना कामगारांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,माढ्यातील श्री जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीत माढा शहर व परिसरातील गावचे जवळपास २५० काम केलेले कामगार आजही पेन्शन मिळावी या मागणीसाठी लढा देत आहेत.
या पुर्वी देखील २६ जानेवारी २०२३ रोजी गिरणी कामगारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र सोलापूरातील क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाच्या आयुक्तांनी " मासिक पेन्शन बाबत कायदेशीर सल्लामसलत करुन निर्णय घेवू असे लेखी आश्वासन दिले होते.मात्र आश्वासनाची पुर्तता केलेली नाही.आजतागायत या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या योजना प्रमाण पत्रावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.सूतगिरणीचे कामगार व कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरणा केलेली आहे व ती रक्कम देखील जमा झालेली आहे.पेन्शन योजना सुतगिरणी राबविणार नसल्याने कामगारांनी फार्म नंबर १० डी व्यवस्थापनाने भरुन घेतलेले असुन ते भविष्य निर्वाह कार्यालयाकडे सादर केलेले आहेत.त्यामुळे कामगारांना मासिक पेन्शन योजना देण्यास भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कोणतीही अडचण राहिलेली नाही.सूतगिरणीच्या कामगारांना पेन्शन मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक परवड सुरु असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. पेन्शनचा मुद्दा गांभिर्याने विचारात घेऊन दोन दिवसांत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबर ला सोलापूरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या समोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर अजिनाथ गायकवाड,सुनील लंकेश्वर,रमेश थोरात,विश्वास ढावरे,संजय साळुंके,वंदना गायकवाड,रेखा गाडे,गंगाराम पवार,यांचेसह गिरणी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments