अडीच लाख टन ऊस कूर्मदास गाळप करणार- चेअरमन माजी आमदार
अॅड.धनाजीराव साठे कूर्मदास साखर कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदीपन
समारंभ
माढा (कटूसत्य वृत्त):- येत्या ऊस गाळपाच्या हंगामात अडीच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कूर्मदास साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.अॅड.धनाजीराव साठे यांनी दिली.श्रीसंत कूर्मदास सहकारी साखर कारखान्याचा २०२३ -२०२४ चा गळीत हंगामाचा १४ वा बाॅयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला.
चिंचगांव टेकडीचे शिवचरणानंद महाराज यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन माजी आ.अॅड.धनाजीराव साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.सत्यनारायण व होम हवन पुजा कारखाना सभासद प्रतापसिंह पाटील व त्यांच्या पत्नी प्राजक्ता यांच्या हस्ते पार पडली.यावेळी बोलताना माजी आ.साठे म्हणाले,ऊस उत्पादक शेतकरी केंद्र बिंदू मानून संत कुर्मदास कारखाना कामकाज करत असुन येत्या काही दिवसात कारखान्याला जिल्हा बॅंकेकडुन कर्ज पुरवठा केला जाणार आहे.यामुळे गाळप हंगामात गाळपास येणाऱ्या ऊस बिलाचे पेमेन्ट दर पंधरा दिवसाला येणार आहे.प्रास्ताविकात कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झाली असून शेतकर्यानी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन साठे यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे चेअरमन अॅड. धनाजीराव साठे,संचालक दादासाहेब साठे,भालचंद्र पाटील,हरिदास खताळ,शशिकांत देशमुख,राहुल पाटील,विठ्ठल शिंदे, सयाजी पाटील,विजयसिंह पाटील,बाळासाहेब पाटील,मधुकर चव्हाण,सिराज शेख,शंकर नाईकवाडे,संध्याराणी खरात,शालिनी कदम,कमल लोंढे,संजय इंगळे,नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,कनिष्का साठे,अजिनाथ माळी,पडसाळीचे सरपंच योगेश पाटील,युवक कॉग्रेसचे भाऊसाहेब वाघ,नगरसेवक अरुण कदम,नाना साठे,नितीन साठे,चंद्रकांत कांबळे,हनुमंत राऊत, प्रभारी कार्यकारी संचालक बाळासाहेब पवार यांच्यासह शेतकरी,कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.संचालक नारायण गायकवाड यांनी आभार मानले.

0 Comments