Hot Posts

6/recent/ticker-posts

आधार वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिक दिन साजरा

 आधार वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिक दिन साजरा 



माढा (कटूसत्य वृत्त):- ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मुख्य मार्गदर्शक घटक असुन ते समाजाला दिशा दर्शक ठरतात असे मत माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांनी व्यक्त केले.

माढा तालुक्यातील वडाचीवाडी(उबृ) येथील आधार वृध्दा श्रमात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी आश्रमामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे संस्थेच्या वतीने जिल्हा  समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी सांगितले.पुढे बोलताना  साठे म्हणाल्या की,पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पध्दती लयास चालली आहे.आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण, प्रेम, माया देतात.समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात. परंतु याच आई- वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते.स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अत्यंत कमी आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सचिन कवले यांनी केलेे.यावेळी मल्लिकार्जुन झाडबुके,दिपक देशमुख, उपळाई च्या सरपंच श्रीमती माळी,शिवाजी काळे, रासपा चे गोरख वाकडे, दाजी कवले,योगेश गंगाधरे,संतोष कवले,राहुल बाबर,बसवराज आखाडे,शंकर डोंगरे,प्रभाकर डोंगरे,सिद्देश्वर कवले यांचेसह ग्रामस्थ  उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत काशीद यांनी तर आभार  धनाजी कवले यांनी मानले.
  

Reactions

Post a Comment

0 Comments