देशमुख कुटुंबियांच्या वतीने कर्मयोगी नेत्रालयास मदतीचा हात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 3, 2023

देशमुख कुटुंबियांच्या वतीने कर्मयोगी नेत्रालयास मदतीचा हात

 देशमुख कुटुंबियांच्या वतीने कर्मयोगी नेत्रालयास मदतीचा हात


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभूर्णी- माढा येथे नव्याने सुरू झालेल्या कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयास देशमुख कुटुंबियांच्या वतीने पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये नेत्रालयास लागणाऱ्या मशिनरी खरेदीसाठी मदत निधी देण्यात आल्याची माहिती नाना भैया युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व युवा उद्योजक सुरज भैय्या देशमुख यांनी दिली.

      याप्रसंगी बोलताना सुरज भैय्या यांनी सांगितले की, माढा तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आ. बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या नेत्रालयाचे संपूर्ण कामकाज चालणार आहे. हे नेत्रालय सुरू करण्याच्या आधी दादांनी अनेक नेत्र शिबीरे आयोजित करीत अनेकांना नव्याने दृष्टी देण्याचे काम केले आहे. या नेत्रालयाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांना ही आपल्या दृष्टी संदर्भातील कोणत्याही आजारांवरती अल्प रक्कमेमध्ये उपचार होणार आहेत. यांचा फायदा सामान्य लोकांना होऊ शकतो. गरजूंना नव्याने दृष्टी प्राप्त होण्यासाठी या नेत्रालयाची मदत होणार आहे. समाजाप्रती बांधिलकी जपत देशमुख कुटुंबीयांनी नेहमीच सामाजिक कार्यास मदतीचा हात दिला आहे. भविष्य काळातही लोकोपयोगी कार्यास मदतीची भावना कायम असल्याचे ते म्हणाले.

*तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या नेत्रालयातून सामान्य लोकांची सेवा होणार आहे.  साधारण दररोज दोनशेहून जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामुळे अनेकांना नव्याने दृष्टी प्राप्त होणार आहे. समाजाचे देणे लागतो ही भावना कायम मनात आहे. नेत्रालयास नवीन मशिनरी खरेदीसाठी जवळपास दोन कोटींहून अधिक खर्च येणार आहे. यामुळे आपण देशमुख कुटुंबियांच्या वतीने मदतीचा निधी नेत्रालयास सुर्पुद केला आहे... सुरज देशमुख, युवा उद्योजक*

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages