Hot Posts

6/recent/ticker-posts

शेटफळ शाळेचे अनोखे पर्यावरण रक्षण; विद्यार्थीनिर्मित मातीच्या गणपतींचे शाळेतच विसर्जन

 शेटफळ शाळेचे अनोखे पर्यावरण रक्षण; विद्यार्थीनिर्मित मातीच्या गणपतींचे शाळेतच विसर्जन


शेटफळ (कटूसत्य वृत्त):- सुखकर्ता असणारे गणराय प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे दुःखकर्ता होऊन बसले होते.यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होऊन मोठ्या प्रमाणात जल प्रदूषणही होते.हे नुकसान टाळणे शक्य असल्याचे सांगत जि.प.प्राथ.शेटफळ ता.मोहोळ शाळेतील उपक्रमशील शिक्षक रविंद्र देबडवार यांनी मुलांना पर्यावरणपूरक मातीपासून गणपती बनविण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.१ली ते ७ वी च्या पन्नासहून अधिक मुलामुलींनी सहभाग नोंदवत अगदी मनमोहक श्रीगणेशाच्या मुर्ती बनविल्या.या मुर्ती बनविताना तुळशीच्या मंजूळा वापरणेत आल्या.अनेकांनी मुर्तीसोबत मातीचे मोदक,उंदीरही बनवले.काहींनी निसर्गनिर्मित रंग वापरले.या उपक्रमास केंद्रप्रमुख सुदाम शिंदे,मुख्याध्यापिका संगिता पाटील यांची प्रेरणा लाभली तर ज्येष्ठ शिक्षिका माधुरी कुलकर्णी,विषय शिक्षक शशिकांत जाडकर,सरीता थोरात,संतोष लोंढे,विठ्ठल पवार,सुवर्णा खडके,माधवी जोशी,तनूजा इंगळे,रजिया तांबोळी,मनिषा थोरात,मयुर गोणेकर,मनिषा वसेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


शाळेच्या प्रांगणातच या मुर्तींचे विसर्जन करुन माती झाडांना घालत शाळेने अनोखे पर्यावरणाचे रक्षण केले.या उपक्रमात युवराज मोरे,अपूर्वा वागज,प्रणव खडके,अथर्व शिंदे,ईश्वरी वाघमारे,प्रज्योत आवताडे,समर्थ काशीद,सार्थक वागज,राजवीर चव्हाण,श्रेया चव्हाण,रणवीर गोंडाळ,आकांक्षा वाघमारे,शिवतेज मोरे,समर्थ अधटराव,प्रगती खडके,ओम राऊत,सोहम मोरे,सुरवी कसबे,आराध्या अधटराव,अनिरुध्द मोरे,श्रेया कदम,सृष्टी गुंड,मयुरेश मोरे,अथर्व पांढरे,मानसी डोंगरे,प्रतिक्षा जाधव,श्रेयस लोहार,विश्वजीत डोंगरे,शिवरत्न वागज,कोमल जाधव,अपर्वा वागज,हर्षदा चव्हाण,समर्थ वाघमारे,रविराज शेंडगे,शिवराज गोंडाळ,काजल माळी,संस्कृती वागज,सायाली लोहार,संजनी खांडके,स्नेहा वागज,श्रेया वागज,स्वरांजली जाधव,अंकिता भांगे,आर्या चव्हाण आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
Reactions

Post a Comment

0 Comments