लऊळ येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीला ग्रामसेवकानी मारली दांडी
लऊळ (कटूसत्य वृत्त):- ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शात्री यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमतः राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मात्र प्रशासकीय कार्यक्रमाला खुद्द ग्रामसेवकांनीच दांडी मारल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमात सरपंच लक्ष्मण भोंग,ग्रामपंचायत सदस्य महेश बागल,प्रभाकर नलवडे,संतोष गवळी, बाळासाहेब चांदणे,डॉ.आशुतोष सावरे,आरती जानराव,बंडू चांदणे, अक्षय लोकरे,खाजभाई पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वरिष्ठांकडे धाव घेणार....
ग्रामसेवक नेहमीच फार कमी वेळ ग्रामपंचायतीत असतात परंतु आज गांधी जयंतीला त्यांनी हजर राहणे अपेक्षीत होते.याबाबतीत वरिष्ठांकडे धाव घेतली जाईल.
राजेंद्र भोंग;अध्यक्ष शिवसेना लऊळ.

0 Comments