स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 3, 2023

स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन

 स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 चे 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आले त्यांचाच भाग म्हणून स्वच्छता ही सेवा अंतर्गत 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती निमित्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली - उगले मा. उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅलीचे आयोजित करण्यात आले. रॅलीचे सुरुवात होम मैदान ते डफरीन हॉस्पिटल ते महापौर निवास मार्गे ते स्टेशन रोड राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुतळा येथे समारोप करण्यात आले सदर रॅली मध्ये सिद्धेश्वर हायस्कूल, हरीभाई देवकरण ज्युनिअर कॉलेज व प्रशाला, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, आयटीआय महिला कॉलेज, ज्ञान प्रबोधिनी शाळा, सोशल कॉलेज सोलापूर व सोलापूर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी आदी उपस्थिती दर्शवली स्वच्छतेचे नारे देत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन करण्यात आले सदर रॅलीमध्ये 5000 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages