Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती निमित्त स्वच्छतेची शपथ

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती निमित्त स्वच्छतेची शपथ

स्वच्छता ही सेवा पंधरवाडा समारोप


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.  स्वच्छता ही सेवा या पंधरवाडा चा समारोप आज करणेत  आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती साजरी करणेत आली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, अधिक्षक विवेक लिंगराज, अधिक्षक राजेश देशपांडे, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरूण क्षीरसागर, प्रशासन अधिकारी जहीर शेख उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रास्तविक करून स्वच्छता श्रमदान मध्ये चांगले योगदान दिले बद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे  अभिनंदन करून आभार व्यक्त केले. या प्रसंगी अरूण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वच्छता ही सेवा मध्ये कर्मचारी यांचे चांगले योगदान  - शेळकंदे
………….
जिल्हयात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या कालावधीत विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे साठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली सर्व गटविकास अधिकारी, तालुका स्तरीय सर्व विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक च, सरपंच, उपसरपंच , ग्राप सदस्य यांचे सह ग्राप स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी चांगले योगदान दिले मुळे स्वच्छता पंधरवाडा निमित्त चांगले उपक्रम घेता आले. महात्मा गांधीजी यांचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे. पाण्याची काटकसरी बरोबर स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगिकारणे साठी लोकांना प्रबोधन केले. आपले कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवा. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments