अनगरला विविध उपक्रमांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
अनगर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती अनगर येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या समारंभास माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की महात्मा गांधींच्या चरित्रात शील व चारित्र्य या गोष्टी आपणास दिल्या त्याच्या माध्यातून सत्याग्रहाचा मार्ग दाखविला 'करेंगे या मरेंगे' हा निकराचा लढा देवून देशाची स्वातंत्र्य चळवळ खऱ्या अर्थाने तीव्र केली आणि सर्व देशवासीयांना एक करून शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर जय जवान जय किसान या घोषणेने लाल बहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांना व जवानांना प्रतिष्ठा मिळवून दिली. यावेळी माधव खरात व तात्या गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केली. कै शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आर एस पी, स्काऊट, गाईड या पथकाच्या वतीने संपूर्ण गाव स्वच्छ करुन श्रमदान केले. मान्यवर व शिक्षक यात सहभागी झाले. यावेळी माजी आमदार राजन, पाटील प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक विश्वजीत लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, नारायण गुंड, रवींद्र पाचपुंड, बाबा मुलानी, माजी सरपंच भागवत शिंदे, माजी सरपंच अंकुश गुंड, शहाजी गुंड, सुधीर गवसने, सारंग गुंड, रामभाऊ कद,उपमुख्याध्यापक सिताराम बोराडे, पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर,चंद्रकांत गुंड, श्रीकांत घाटोळे आदी ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर सोमनाथ ढोले यांनी आभार मानले.
.png)
0 Comments