गांधी विद्यालय चिखली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर
शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
चिखली (कटूसत्य वृत्त):- गांधी विद्यालय चिखली तालुका जिल्हा धाराशिव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .जयंतीचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी, पालक, शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून गोरख मते, शंकर इंगळे ,संदीप इंगळे व शिवाजीराव कदम हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.के. चव्हाण यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी बाल वक्त्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले .तसेच प्रमुख पाहुण्यांनी शाळेने राबवलेल्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थी पालक आणि शिक्षक यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी जी के चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी प्रसिद्धी प्रमुख भोसले डि.के.उपस्थित होते.
.png)
0 Comments