Hot Posts

6/recent/ticker-posts

मानेगाव येथील डोंबारी समाजाच्या वस्तीत महात्मा गांधीं जयंती साजरी

 मानेगाव येथील डोंबारी समाजाच्या वस्तीत महात्मा गांधीं जयंती साजरी

महिला बचत गटाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील मानेगाव येथील भटक्या विमुक्त जमातीतील डोंबारी समाजाच्या वस्तीत जाऊन महिला बचत गटाच्या वतीने सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन महिला बचत गटाच्या सीआरपी शीतल देशमुख व नवनियुक्त सीआरपी रोहिणी भोगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नवनियुक्त सीआरपी रोहिणी भोगे यांनी सांगितले की, आधुनिक समाजातील उच्चभ्रू वर्गातील महिला,पुरुष व विद्यार्थी यांच्याप्रमाणेच भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे.या लोकांमध्ये स्वच्छता व आरोग्य याविषयी प्रबोधन व जनजागृती केली पाहिजे.या लोकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून शासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला बचत गटाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद दिसून आला.

यावेळी सीआरपी शीतल देशमुख, गामसंघ लिपिक मोहिनी पारडे, पंचफुला भोगे,ज्योती पवार,काजल पवार,संगीता पवार,सोपान पवार, रमेश शिंदे,सुरेश शिंदे,सर्जेराव पवार, दिलीप पवार यांच्यासह डोंबारी समाजातील लोक व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Reactions

Post a Comment

0 Comments