काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार रहावे - श्रीरंग चव्हाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 6, 2023

काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार रहावे - श्रीरंग चव्हाण

 काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी

 काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार रहावे - श्रीरंग चव्हाण

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापुर शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सोलापुरचे निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षेतेखाली माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापुर येथे आयोजित केले होते. याकार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी  केले. तसेच पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना निरीक्षक श्रीरंग चव्हाण म्हणाले की, सोलापुरला सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासारखे समर्थ नेतृत्व लाभले आहे. पक्ष संघटना, बूथ कमिटी मजबूत असेल तरच पक्ष मजबूत होईल. १९७८ ला काँग्रेस पक्षावर संकट आले होते पण स्व. इंदिराजी गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा झंझावत निर्माण करून सर्वांचा धोबीपछाड करून प्रचंड विजय मिळविला. २०१४ नंतर काँग्रेस पक्ष अतिशय कठीण प्रसंगातुन जात असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे, तोड़फोडीच्या राजकारणामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या काढलेल्या भारत जोड़ो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलले आहे जनतेत काँग्रेसबद्दल आपुलकी वाढली आहे.  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी पक्षाने वेळोवेळी दिलेले कार्यक्रम करावे. मतदार नोंदणी, काँग्रेस पक्षाची संघटना, बूथ कमिटया मजबूत करून, जनतेत जाऊन जनजागृती करून आगामी निवडणुकीत सक्षमपणे उतरण्यासाठी तयार रहावे. पदे घेऊन काम न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रामाणिकपणे काम करा पक्ष त्यांची नक्कीच दखल घेईल. आजची आढावा बैठक ही अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली असून पदाधिकाऱ्यांनी आपाआपली माहिती सादर केली येणाऱ्या ०८ ऑक्टोम्बर रोजी पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हानिहाय आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे घेणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणितीताई शिंदे, बसवराज पाटील, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वजीत कदम, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, बैठकीचे समन्वयक संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राची विभागाची बैठक पुणे काँग्रेस भवन येथे आयोजित केली आहे. त्या ठिकाणी ही सर्व माहिती दिली जाईल.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, प्रदेश सचिव अलकाताई राठोड, किसन मेकाले गुरुजी, प्रा. नरसिंह आसादे, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, आरिफ शेख, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, फिरदोस पटेल, सौ. अनुराधा काटकर, परविन इनामदार, प्रवक्ते प्रा. अशोक निंम्बर्गी, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मा. परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, मुकबुल मोहोळकर, अनिल पल्ली, भोजराज पवार, हारुण शेख, उपेंद्र ठाकर, सिद्धाराम चाकोते, रवी यलगुलवार, अश्विनी जाधव, प्रवक्ते वशिष्ठ सोनकांबळे, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, अंबादास गुत्तिकोंडा, बसवराज म्हेत्रे, अँड केशव इंगळे, हेमाताई चिंचोळकर, सहदेव ईप्पलपल्ली, रामसिंग आंबेवाले, शकील शेख, युवराज जाधव, अशोक कलशेट्टी, चक्रपाणी गज्जम, विकास येळेगावकर, चंद्रकांत कोंडगुळे, शिवशंकर आंजनाळकर, दशरथ गायकवाड, लखन गायकवाड, प्रवीण वाले, परशुराम सतारावाले, राजेश झंपले, लतीफ शेख, श्रीकांत वाडेकर, महेश जोकारे, अशोक सायबोळू, दीनानाथ शेळके, कालिदास काळपागार, गौतम मसलकांब, मोहसीन फुलारी, संजय गायकवाड, मल्लिनाथ सोलापुरे, मनोज डिगे, अनिल जाधव, श्रीधर काटकर, ज्ञानेश्वर जाधव, शरद गुमटे, धीरज खंदारे, समीर काझी, अरुणा (भाभी) वर्मा, सुमन जाधव, विणाताई देवकते, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, रेखा बिनेकर, अंजली मंगोडेकर, मुमताज मदर शेख, लता सोनकांबळे, मुमताज तांबोळी, रुकीया बानू बिराजदार, मुमताज शेख, द्रोपदी शिवशरण, चंद्रकांत टिक्के, नागनाथ शावणे, शशिकांत शेळके, देवेंद्र सैनसाकळे, हाजी महमूद शेख, करीम शेख, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, आभार भिमाशंकर टेकाळे यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages